ईतर

सहकार सप्ताह निमित्त चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन;तीर्थक्षेत्राला जाण्यापेक्षा सहकार क्षेत्राला भेट द्या एसडीओआशिष बीजवल!

पुसद : महाराष्ट्र शासनाचा सहकार सप्ताह १९ जून ते सहा जुलै २०२६ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या सहकार सप्ताह मध्ये सहकार विभागाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत त्यात परिसंवाद,चर्चासत्र ,साफसफाई रक्तदान, वृक्षारोपण मोहीम, जनजागृती रथ, जनजागृती शिबिरे, माहितीपट, प्रश्नमंजुषा स्पर्धा, यशोगाथा, रुग्णांना फळ वाटप, अनाथ व विकलांग मुलांना साहित्य वाटप, शाळेतील मुलांना साहित्य वाटप त्याचबरोबर इतर नाविन्यपूर्ण सहकारी उपक्रम या बाबीचा समावेशआहे.

पुसद येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय आयोजित सहकार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी परिसंवाद व चर्चासत्र जेष्ठ नागरिक भवन विरंगुळा केंद्र पुसद येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी पुसद हे होते त्यांनी बोलताना सांगितले की एक वेळ तीर्थक्षेत्राला जाणे टाळा परंतु महाराष्ट्रातील चांगल्या सहकार उद्योगाला भेटी द्या व अभ्यास करा व अभ्यास करा. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र मागासलेले असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची माहिती दिली. सहकार क्षेत्राचे विविध उपक्रम हाती घेऊन सर्वांनी सहकार क्षेत्र वाढवले पाहिजे असे सांगितले. यावेळी मंचावर केशव मस्के सहायक निबंधक ,अरविंद राठोड विभागीय अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँक पुसद हे होते .या कार्यक्रमाला तालुक्यातील ३७ सेवा सहकारी संस्थाचे संचालक, उपाध्यक्ष अध्यक्ष, सचिव व पतसंस्थाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली, बोलताना पुढे केशव मस्के यांनी सांगितले की सहकारी सोसायटी यांनी १५१ उपक्रमा पैकी अनेक योजनेचा लाभ घ्यावा. केंद्र शासनाची शासकीय गोदाम योजना असो किंवा इतर योजनेचा लाभ घेण्यात यावा. केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयानी पुसद मधील ३७ पैकी २० संस्था चे संगणकीकरण केलेअसून त्यांचे रेकॉर्डअद्यावत झाले असून ते आता कोणालाही पाहता येईल. यासह अनेक योजना बद्दल त्यांनी माहिती विशद केली व शासनाचा विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक यु. एन. वानखेडे यांनी केले त्यांनी प्रास्ताविकात केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाच्या विविध योजना व प्रमुख उद्दिष्ट याबद्दल माहिती दिली यावेळी तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , संचालक सचिव तसेच पतसंस्था चे अधिकारी अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close