कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेहाचा घातपातच;स्थानिक गुन्हे शाखा पुसदच्या पोलिसांचा अवघ्या काही तासांत खुनाच्या गुन्ह्यांचा उलगडा!

पुसद: ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घाटोडी औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) परिसरातील पक्के बांधकाम असलेल्या पडीत कॉटरच्या जिना असलेल्या टॉवरच्या स्लॅबवर कुजलेल्या अवस्थेत एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता हा मूर्तध्ये कुजलेल्या अवस्थेत असल्याने या मूर्त देण्याची ओळख पटवली पोलिसांसमो मोठे आव्हान होते. परंतु तात्काळ या प्रकरणात मृत व्यक्तीची ओळख पटली नामे संतोष अजबराव जाधव वय ३५ वर्षे रा.मधुकर नगर ता. पुसद जि. यवतमाळ,असून, मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविणे मोठे आव्हान होते. मात्र या मृतदेहाची अवस्था बघून घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना हा घातपाताच असल्याचा संशय आला होता त्यावेळी पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि स्थानिक चौकशीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. या घटनेचे गांभीर्य ओळखत पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष चौधरी व स्थानिक गुन्हा शाखेच्या त्यांच्या सहकार्यांनी तपास करत कोणताही पुरावा नसताना सदर मृतकाचा मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहिती संकलित केली असता या गुन्ह्यात एक विधी संघर्षित बालक याची ओळख असल्याचे निष्पन्न झाले त्याच्या माहितीच्या आधारे विचारपूस केली असता त्याचा साथीदार आरोपी श्याम अशोक राठोड वय १९ वर्षे रा. अश्विनपूर या दोघांनी मिळून संतोष अजबराव जाधव यास औद्योगिक वसाहतीत मोटरसायकल बोलावून त्याच्या मोटर सायकल विकून त्याचे पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्याचा शेल्यानी गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत औद्योगिक वसाहतीतील पक्के बांधकाम असलेल्या कॉटरच्या जिन्याच्या स्लॅबवर टाकून दिल्याचे आरोपीने कबूल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासातच या गुन्ह्यांचा तपास करून उलगडा केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, दि.१४जुलै२०२६ रोजी उपविभाग पुसद येथे हजर करीत असता माहिती मिळाली की पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे घाटोडी औद्योगिक वसाहतीतील (MIDC) पक्के बांधकाम असलेल्या जिन्याच्या टॉवरवर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला त्यावेळी पोलिसांनी तात्काळ या मयत व्यक्तीची ओळख पटवली इसम नामे संतोष अजबराव जाधव वय ३५ वर्ष, रा. मधुकर नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यास कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणाने गळा आवळून जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्य उद्देशाने याचे प्रेत घाटोडी औद्योगिक वसाहतीतील ( MIDC( बिल्डींगच्या जिन्याच्या टावरवर टाकून दिल्याने पोलीसांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु रजि नंबर २८/२०२६ कलम १९४ भारतीय नागरीक सुरक्षा संहीता वरुन पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अप क्रमांक ४४५/२०२६ कलम १०३ (१), ६१ (२), ३ (५) भान्यास प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर प्रेताची पाहणी करत असताना त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणाने जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केला असावा त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सा यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांना सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्या करीता आदेशित केले होते.त्यावेळी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असताना त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांनी सदर गुन्हांतील अज्ञात आरोपी शोध कामी तिन पथके तयार करुन योग्य त्या सुचना दिल्या त्याप्रमाणे स्थागुशा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हांतील मृतक यांचे मोबाईल क्रमांकाचे तांत्रीक विश्लेषन तसेच गोपनिय माहीती संकलीत केली असता सदर मृतक व गुन्ह्यांतील एक विधीसंघर्षीत बालक यांची ओळख असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या माहीतीच्या आधारे विचारपूस केली असता. विधीसंघर्षीत बालक व त्याचा साथीदार आरोपी शाम अशोक राठोड वय १९ वर्ष, रा. अश्वीनपुर ता.पुसद यांनी संगणमत करून मृतक संतोष अजबराव जाधव वय ३५ वर्ष, रा. मधुकरनगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यास घाटोडी (MIDC) येथे मोटार सायकलसह बोलावून त्याचे मोटार सायकल विकून त्याचे पैसे मिळविण्यासाठी त्याकारणाने त्याचा शेल्यानी गळा आवळून जिवेठार मारुन पुरावा नष्ठ करण्याचे इराद्याने त्याचे प्रेत घाटोडी येथील औद्योगिक वसाहतीत (MIDC) पक्के बांधकाम असलेल्या जिन्याच्या टॉवरवरील स्लॅबवर टाकून दिल्याचे सांगितल्याने आरोपी शाम अशोक राठोड वय १९ वर्ष, रा. अश्वीनपुर ता पुसद जि यवतमाळ यांचा शोध घेवून त्यास सदर गुन्हांच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने देखील गुन्हा केल्याचे कबूल केल्याने पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अप क्रमांक ४४५/२०२६ कलम १०३ (१), ६१ (२), ३(५) भान्यास हा अतिशय क्लिष्ट व गुंतागुतीचा गुन्हाचा छेडा लावून काही तासात हा गुन्हा उघड करुन आरोपी १) शाम अशोक राठोड वय १९ वर्ष, रा. अश्वीनपुर ता. पुसद जि. यवतमाळ यास पुढील तपास कामी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ श कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद अमर मोहीते सा तसेच मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. सहा पोलीस निरीक्षक, आशिष चौधरी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि अमोल राठोड, पोउपनि शिवशंकर कार्यदे, सफो मुन्ना आडे, सफो राहुल गोरे, सफी संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोहवा सोहेल मिर्झा, पोहवा मिथुन जाधव, पोना अमित झेडेकर, पोशि महेश वाकोडे, पोशि सुनिल पंडागळे, पोशि/पवन ढवळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोहवा विवेक पेठे चापोशि राजेश जाधव, चापोशि अतिम कुमरे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच पोउपनि राहूल देशमुख, पोउपनि कैलास ससाने, पोउपनि रवि चव्हाण व पथक सर्व पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



