अवैध सावकारी करणाऱ्या चार सावकाराच्या घरासह एका दुकानावरही छापा ; तीघांच्याघरी कोरे स्टॅम्प पेपर व धनादेश जप्त तर एकाकडे कोणतेही आक्षेपार्ह दस्तावेज आढळले नाही!

पुसद : शहरांसह तालुक्यात चार अवैध सावकाराच्या घरासह एका दुकानावरही सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने छापे मारून आक्षेपार्ह दस्तावेज त्यामध्ये काही सह्या केलेले कोरे स्टॅम्प पेपर, कोरे धनादेश व संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत या छापा कारवाईत तीघांच्याघरी कोरे स्टॅम्प पेपर व धनादेश चिठ्ठया, डायऱ्या असे आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले तर एका अवैध सावकारकडे कोणतेही आक्षेपार्ह दस्तावेज आढळले नसल्याची माहिती आहे. परंतु या कारवाईने शहरासह तालुक्यात अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 
याबाबत सहकारी कार्यालयाच्या सूत्राने ‘झेप न्यूज’ला दिलेली माहिती अशी की, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळच्या कार्यालयाकडे श्रीरामपूर येथील रहिवाशी असलेले माधव किसन गव्हाणे व सुभाष दुलबा डवले रा. ग्रीन पार्क १ यांनी गैरहर्जदार संतोष अजबराव कदम रा.गौळ बाजार ता.कळमनुरी (ह.मु. शेंबाळपिंपरी बस स्टँड लागू हॉटेल),समाधान वामनराव पाटील हे अनिल पवार रा. बंजारा कॉलनी यांच्या येथे भाड्याने राहतात, प्रकाश शंकरराव चोरमले रा.इसापूर व दिलीप सखाराम उत्तरवार रा. ग्रीन पार्क या अवैध सावकाराविरुद्ध काही दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळच्या कार्यालयाने तात्काळ तक्रारीची दखल घेऊन चार पथक तयार करून आज ता.१५जुलै २०२६रोजी या पथकामार्फत एकाचवेळी शहरासह तालुक्यात अवैध सावकारी करणाऱ्यांच्या घरासह एका दुकानावरही छापा टाकला त्यामध्ये संतोष कदम यांच्या शेंबाळपिंपरी येथील बस स्टॅन्ड ला लागून असलेल्या हॉटेलमध्ये झाडाझडती घेतली असता त्या छाप्यात१९ विविध प्रकारचे आक्षेपार्ह दस्तऐवज ज्यामध्ये स्टॅम्प पेपर, चिठ्ठ्या, डायऱ्या अदी आक्षेपार्ह दस्तावेज आढळून आले ते सर्व आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात .तर समाधान पाटील हे अनिल पवार यांच्या घरी भाड्याने राहत असून त्यांच्या घराची झडती घेतली असता ९ वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त केले. ग्रीन पार्क येथील रहिवाशी असलेले दिलीप उत्तरवार यांच्या राहत्या घरांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरामधून २६ प्रकारचे आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले.तर इसापूर येथे रहिवाशी असलेले प्रकाश चोरमले यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह दस्तावेज आढळून आले नाही त्यामुळे जप्तीबाबत कारवाई करण्यात आलेली नाही. पण अवैध सावकारी व्यवहाराबाबत जिल्हा निबंधक सहकार कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत सहकार विभागाच्या पथकाने ही झाडाझडतीची कारवाई केल्याने अवैध सावकारी व बेकायदेशीरपणे व्याजाचा धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सुज्ञनागरिकांनी अवैध सावकारी व्यवहारांविरोधात सहकार विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कारवाई सावकारांचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुसद के.एस. मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण ४ सावकारी पथकाव्दारे ४ ठिकाणी झडती बाबतची कारवाई करण्यात आलेली आहे.या कारवाईतील पथकामध्ये श्री.एस.एस. पिंपरखेडे सहकार अधिकारी श्रेणी-१,एम. एम. भगत सहकार अधिकारी श्रेणी-१,जी.पी. राठोड सहकार अधिकारी श्रेणी-१, चेतन रतनसिंग राठोड सहकार अधिकारी श्रेणी-२, सतिश जाधव लेखापाल, कु. सविता चांदेकर सहकार अधिकारी श्रेणी-२,आर.पी. गाडे सहकार अधिकारी श्रेणी-२, माणीक चव्हाण सहकार अधिकारी श्रेणी-२, किशोर गावंडे लेखापरीक्षक श्रेणी-२, रामदास रिठ्ठे लेखापरीक्षक श्रेणी-२,ए.एम. काळमोरे सहाय्यक सहकार अधिकारी, कु.ए.आर.कांबळे उपलेखापरीक्षक, कु.ए.एम. काळे कनिष्ठ लिपीक, संतोष गोरे कनिष्ठ लिपीक, कु.ए.जे. राठोड ग्राम महसुल अधिकारी, कु.व्ही.बी. इंगोले ग्राम महसुल अधिकारी, श्रीमती जे.व्ही. खैरे ग्राम महसुल अधिकारी, पंच म्हणुन तहसिल कार्यालयातील ४ व सहकार विभागातील गटसचिव ४ अधिकारी / कर्मचारी व पोलीस प्रशासनातील ८ अधिकारी/कर्मचारी व४ व्हिडीओ फोटोग्राफर हे सदर कारवाई मध्ये सहभागी होते.



