क्राइम

मध्यप्रदेशातून आणलेल्या देशी बनावटीच्या पिस्तूलसह एकास अटक;पुसद शहर पोलिसांची मोठी कारवाई!

पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या डि.सी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डि.बी. स्टाफ हद्दीत पेटोलिंग करत असतांना त्यांना खबऱ्या कडून खात्रीलायक खबर मिळाली की, पुसद ते माहूर रोडवर माहूर फाटा येथे मध्यप्रदेशातील एक इसम हा देशी बनावटीच्या पिस्तूल घेवून विक्री करण्याचे उद्देशाने उभा आहे असे समजल्याने त्याबाबत तात्काळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांचाळ यांना माहीती देवून त्यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे डि.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक दिनकर दमकोडवार, पो. हवा प्रफुल इंगोले, पो. कॉ. आकाश बाभूळकर, पो. कॉ. शुध्दोधन भगत, पो. कॉ. वैजनाथ पवार असे यांनी संध्याकाळी ५.०० वा माहूर फाटा येथे जावून तेथे उभ्या असलेल्या माहीती मिळालेल्या इसमास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सन्नी उर्फ अभिषेक अर्जुन आर्य वय २४ वर्ष, रा. सड़क मोहल्ला चिंचोली जि. बैतुल राज्य मध्यप्रदेश असे सांगितले नंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्ट मध्ये कमरेला खोचून एक गावठी बनावटीचे देशी पिस्तुल मॅगझीनसह कि अंदाजे ३०,०००/- रू. चे मिळून आले. त्याबाबतची फिर्यादी ही पो. हवा. प्रफुल इंगोले यांनी दिल्याने पुसद शहर पोलीस स्टेशन अप. क. ४३७/२०२३ कलम ३,२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड साहेब, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप , सहायक पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे सुचना प्रमाणे डी.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक दिनकर दमकोडवार, पोहवा प्रफुल इंगोले, पो कॉ आकाश बाभुळकर, पो. कॉ. शुध्दोधन भगत, पो.कॉ वैजनाथ पवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close