क्राइम

उमरखेड मध्ये विधीसंघर्ष बालकाची वाढतेय दहशत; दोन चोरी घरफोडीचे गुन्ह्यांची उकल डि.बी.पथकांची प्रशंसनीय कामगिरी!

उमरखेड/ प्रतिनिधी: पोलिस स्टेशनच्या हद्दीत मागील काही दिवसांपुर्वी घरफोडी करून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या त्याच अनुषंगाने डीपी पथकाने घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्तास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ९हजार५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे घरफोडीचे दोन गुन्ह्याची उकल झाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, ‍उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसांमधील झालेल्या घरफोडी करून चोरी केल्याच्या घटनांमुळे जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ यांनी गुन्हे उघडकीस आणणे कामी ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ साहेब यांना आदेशीत केले होते, त्या अनुषंगाने त्यांनी डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांचे टीमला सदर गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचंना दिल्या होत्या, त्याप्रमाणे डी.बी. टीम सदर गुन्हयातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण, सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनीय माहीतीच्या आधारे शोध घेत असतांना दि,९ ऑगस्ट२०२६ रोजी डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना सदरचा गुन्हा उमरखेड येथील आल्पवयीन आरोपी यांनी केल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाल्याने त्याप्रमाणे सदर अल्पवयीन आरोपी यांचे वयाबाबत खात्री करून त्यांचे पालकांचे उपस्थित चौकशी केली असता त्यांनी दि. २७ जुलै२०२६ रोजी पहाटे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हॉटेल व दि.९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ढाणकी रोडवरील न्यु विदर्भ कोल्ड्रिंक्स हॉटेल फोडल्याचे कबूल केले असुन त्यातील चोरलेल्या रक्कम पैकी खर्च करून शिल्लक राहीलेली रक्कम रूपये ९५००/- रू. गुन्ह्यांत जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे डी.बी. पथकाने घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणुन प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे.

सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अमर मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद विभाग अतिरीक्त कार्यभार उमरखेड उपविभाग, मा. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड पो. स्टे यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहा. फौजदार विजय पतंगे, पो. हवा. चंदन जाधव, पो. हवा. जय राठोड, पो. हवा. प्रकाश बोंबले, पो. हवा. गिरीष बेंद्रे, पो.कॉ. संघशिल टेंभरे, पो.कॉ. विष्णू राठोड, पो. कॉ. दिगांबर गिते, पो.कॉ. निवृत्ती महाळनवर सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close