तलवार बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात; पुसद शहर पोलीसांची कारवाई!

पुसद : शहर ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना मिळताच शहर पोलिसांनी आपल्या हद्दीतील तुकाराम बापू वार्डातील एका घरावर छापा टाकून झाडाझडती घेतली असता त्या घरात पोलिसांना धारदार तलवार मिळुन आली असून ही तलवार जप्त करून पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे.
अक्षय भगवान उघडे, वय-३० वर्षे, रा. तुकाराम बापु वार्ड पुसद ता. पुसद जि.यवतमाळ असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुसद शहर ठाण्याच्या हद्दीत तुकाराम बापु वार्डातील रहीवाशी असलेला तरुण नामे अक्षय भगवान उघडे, वय-३० वर्षे, रा. तुकाराम बापु वार्ड पुसद हा तलवार बाळगत असुन त्याने सदरची तलवार ही त्याचे राहते घरी तुकाराम बापु वार्ड पुसद येथे लपवुन ठेवली आहे. अशा पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन सदर तरुणांच्या घराची झडाझडती घेतली असता त्याचे घरातील खोलीतील लाकडी पलंगाखाली एक धारदार तलवार शस्त्र ज्याला धारदार पाते व निमुळते टोक असलेले घातक शस्त्र अवैधरीत्या बाळगतांना मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली व आरोपी विरुध्द पुसद पोलीस ठाण्यात ४/२५ आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड साहेब पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद शहर ठाण्याचे ठाणेदार पो.नि. सेवानंद वानखेडे यांचे नेतृत्वात पो. हे. कॉ. अतुल दातीर, पो.ना. दिनेश सोळंके, पो.कॉ. अनुप मडके, पो. हे. कॉ. रजनी बानाईत इ. यांनी सदरची कार्यवाही पार पाडली



