विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कृउबासची कारवाई; ९ दुकाने सील!

पुसद : शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्या ९ दुकानदारावर कारवाई केली असून या दुकानांना सील लावले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शेख कौसर शेख अख्तर यांनी ‘झेप’ न्यूजला दिली आहे. त्यामुळे पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीत विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ व नियम १९६७ अंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे नियमन करण्यात येते. परंतु पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अनेक व्यापारी, काही कडधान्य खरेदी -विक्रेते दुकानदार कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी-विक्री करीत असल्यानेअशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आता कठोर पावले उचलले असून या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात आज दि, १८जुन २०२६ रोजी विनापरवाना सुरू असलेल्या अवैधरित्या शेतमाल खरेदी -विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली असून
विनापरवाना शेतमालाची खरेदी विक्री करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १) ओंकार ट्रेडर्स २) माधव ट्रेडर्स ३) नारायणदास गिरीधरलाल बजाज ४) सुरज ट्रेडिंग कंपनी ५) इनानी ट्रेडिंग. ६) जनता ट्रेडर्स ७) निरबाण ट्रेडर्स वाशिम रोड ८) निरबाण ऍग्रो प्रोसेस (एमआयडीसी) ९) दत्तगुरु ट्रेडर्स संबंधित दुकानाची तपासणी करण्यात आली असून या तपासणी दरम्यान बाजार समितीचे नियम व अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी या संबंधित दुकानावर नियमानुसार कारवाई करण्यात आली असून काही दुकाने तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आली आहे. त्यामुळे विनापरवाने शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे धाबे दणाणले आहे. पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांनी अधिकृत परवानाधारकाकडुनच शेतमालाची खरेदी -विक्री करावी असे आव्हान केले.
असून जर यापुढे कोणताही व्यापारी दुकानदार किंवा शेतकरी शेतमालाची खरेदी विक्री नियमबाह्य पद्धतीने करेल अशा व्यापाऱ्यावर किंवा व्यवसायिकावर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कठोर कारवाई केली जाईल विनापरवानाधारकांना असा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईत केशव मस्के सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुसद शेख कौसर शेख अख्तर कृउबा सभापती ,अभय रामचंद्र राठोड उपसभापती दत्तराव पाटील रवींद्र निकम उत्तमराव ढोले अजय उतळे व इतर संचालकासहबाजार समितीचे सहसचिव एन एस पटेबहादुर अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.



