पुसद शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत नदीच्या तीरावर एक इसम विक्री करीत होता गांजा ; उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकांनी त्याच्यावर टाकला छापा..

पुसद : उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या आदेशाने पोलीस उपविभागात पोलीस पथकाने अवैध धंद्यांविरुध धडक कारवाई सुरू केली असून दि.६ एप्रिल रोजी सोमवारी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पूस नदीच्या तीरावर गांजाची विक्री करणाऱ्यावर छापा टाकून कार्यवाही करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,दि.६एप्रिल२०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मुखबिर कडुन खात्रीलायक माहिती प्राप्त झाली की, पोलीस स्टेशन पुसद शहर हद्दीतील हनुमान वार्ड पुसद येथील पुस नदीच्या बांधालगत एक इसम गांजा हा अंमली पदार्थ अवैधरित्या विक्री करीता बाळगुन आहे अशा माहिती वरून हर्षवर्धन बी.जे. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसद यांनी सहा. पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांचेसह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद यांचे पथकासह कार्यवाही करणे करीता पाठविले.सपोनि प्रेमकुमार केदार व आमचे अधिनस्त पथकाने हनुमान वार्ड पुसद येथील पुस नदीच्या बांधालगत छापा कार्यवाही केली असता, तेथे एक इसम नामे मोहम्मद हबीब मोहम्मद हदीस वय २९ वर्ष रा. उदयपुर पोस्ट बकरा ठाणा सरया जिल्हा मुजफरपुर ह.मु. गुलजमान उर्फ भु-या यांचे घरी गडी वार्ड पुसद हा अवैधरित्या एका प्लॅस्टीकचे पन्नी मध्ये ३२४ ग्रॅम मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा प्रतिबंधीत गांजा अंमली पदार्थ किंमत अंदाजे ५१८४/- रुपयाचा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगतांना मिळून आला. सदर आरोपी इसमास गांजा अंमली पदार्थ कोटुन आणला याबाबत विचारपुस केली असता, त्याने सदर गांजा अंमली पदार्थ गुलजमान उर्फ भुऱ्या अलीयार खान वय ४६ वर्ष रा. गडीवार्ड पुसद यांचा असुन त्यानेच आरोपी नामे मोहम्मद हबीब मोहम्मद हदीस यास ३००/- रु. रोजाने गांजा विक्री करीता ठेवले आहे असे सांगीतले वरुन आरोपी क्रमांक १) मोहम्मद हबीब मोहम्मद हदीस वय २९ वर्ष रा. उदयपुर पोस्ट बकरा ठाणा सरया जिल्हा मुजफरपुर ह.मु. गुलजमान उर्फ भु-या यांचे घरी गडी वार्ड पुसद. २) गुलजमान उर्फ भुऱ्या अलीयार खान वय ४६ वर्ष रा. गडीवार्ड पुसद यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन पुसद शहर येथे कलम २० (b)(ii)(a) NDPS ACT प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गांजा विक्री करणाऱ्यावर ही छापा कार्यवाही कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात आमचे आदेशाने सपोनि प्रेमकुमार केदार, पोउपनि दिपक उईके, पोहवा ६९८ सुनिल मदणे, पोहवा २०८१ दिपक अरगडे, पोहवा/२१७७ शंकर टाळीकोटे, पोहवा /१४६३ मनोज कदम, पो. अं./२०३८ आकाश बाभुळकर, पो. अं. ४४ जुनेदअली, मपोअं २००३ नेहा चव्हाण यांनी केली आहे. अशाप्रकारे पोलीस उपविभागात कोणीही इसम अवैधरित्या गांजा किंवा इतर मादक पदार्थ विक्री, वाहतुक किंवा स्वतःचे शेतात लागवड कुरीत असल्यास स्थानिक नागरिकांनी निर्भय होवुन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथे माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन नागरिकांना पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.



