ईतर

सुवर्णकन्या कु. साक्षी बुरकुलेचा श्री अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांच्या हस्ते सत्कार!

पुसद : नुकत्याच रायपूर (छत्तीसगड) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया २०२६ वेटलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद द्वारा संचालित श्री विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालय, सवना येथील विद्यार्थिनी कु. साक्षी सुशिला बुरकुले हिने सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयासह पुसद व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.या अभूतपूर्व यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी स्वतः साक्षीच्या निवासस्थानी भेट देऊन तिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढा भरवून सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक श्री निळकंठ पाटील, श्री अविनाश देशमुख, प्राचार्य प्रदीप जयस्वाल, प्रा. डॉ. केशव चेटुले यांची उपस्थिती होती. याच प्रसंगी संस्थाध्यक्षांनी साक्षीला आर्थिक मदतीची घोषणा देखील केली.साक्षी सध्या बी.कॉम अंतिम वर्षात शिक्षण घेत असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश संपादन केले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या साक्षीचे पालनपोषण तिची आई शेतमजुरी करून करत आहे. अशा कठीण परिस्थितीतही साक्षीने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच अमरावती विद्यापीठाचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले प्रशिक्षक श्री रोशन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी नियमित सराव करत आहे. पुसद येथील रावजी जिममध्ये लेडीज ट्रेनर म्हणून पार्ट-टाईम काम करत ती स्वतःच्या सरावाचा खर्चही भागवत आहे.
या यशस्वी प्रवासात महाविद्यालयाच्या प्राध्यापकवृंदानेही साक्षीला आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले आहे.यावेळी श्री अनिरुद्ध पाटील यांनी साक्षीच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील काळातही तिने देशासाठी पदके मिळवून नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.साक्षीच्या या यशामुळे पुसद परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या कुटुंबीयांनी व प्रशिक्षकांनीही या यशामागील तिच्या कठोर परिश्रमाचा विशेष उल्लेख केला आहे. महाविद्यालया मध्ये तीला प्रथम वर्षा पासून तीला महाविद्यालयाचे व्यवस्थापक श्री शिवाजीराव देशमुख, माजी प्राचार्य डॉ हेमंत महल्ले, सेवा निवृत्त शारीरिक शिक्षण संचालक डॉ केशव चेटुले,प्रा प्रदीप जयस्वाल व प्राध्यापक वृंद यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close