क्राइम

वसंत नगर ठाण्याच्या हद्दीत ठाणेदारांच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांना ऊत, मटका, अवैध गावठी, देशी दारू, गुटखा विक्री,हाप्ता वसुली बेधडक सुरू; सुभेदारी मिळाल्यासारखा बिट जमादारांचा कारभार!

पुसद: येथील वसंत नगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराची सुत्रे स्विकारली तेव्हापासून अवैध धंद्यांना अप्रत्यक्ष पाठबळ देत आहेत की काय? या ठाणेदाराच्या आशिर्वादाने परिसरातील पाचही बीट मध्ये प्रत्येक गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा अवैद्य गावठी दारू, देशी दारू, बैल बाजारात अवैध वसुली, अवैध प्रवासी वाहतूक, रेती वाहतूक व साठेबाजी केली जात आहे. अवैध ‌मटका, जुगार, तितली भवरा, प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटखा विक्री यासारखे अवैध धंदे मोठ्या जोमाने खुलेआम सुरु असून या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार दाखल केली होती हे अवैध धंदे ज्या बीट जमादाराच्या आशिर्वादाने सुरू आहेत त्यांची तात्काळ जिल्हा बाहेर बदली किंवा त्यांना शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली होती परंतु संबंधित प्रमुखानी याप्रकरणी लक्ष न दिल्याने पुन्हा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्याने उच्छाद मांडला असून या पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेच या भ्रष्ट बिट जमादारांना सुभेदारी दिल्याने हे बीट जमादार या वतनाची सुभेदारीच मिळाल्यासारखे वावरत असुन या अवैध धंद्यावाल्यांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देत असल्यामुळे पुन्हा हे अवैध धंदे पाचही बीट मध्ये मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी तक्रारकर्त्यानी केली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद वसंत नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाचही बीटमध्ये गल्लोगल्ली चौका चौकात अवैध धंद्यांना ऊत आला आहे अवैध धंदे मटका ,जुगार, दारु अड्डे आढळून आल्यास त्याला सर्वस्वी संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. एवढेच नाही तर आपल्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे धंदे सुरू नाहीत असे हमीपत्र द्यावे लागणार असे आदेश होते तरीही वसंत नगर पोलिसांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय? असा प्रश्न पडला आहे.जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचे अवैध धंदे चालू द्यायचे नाहीत, तसेच या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे,असे जिल्हा पोलीस अधीक्षकाचे आदेश असतांना सुद्धा पुसद शहरातील सध्या वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचही बीटमध्ये बीट जमादाराच्या हप्ते खाऊ धोरणामुळे या अवैध धंद्यांना ऊत आला आहे.या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती परंतु आजपर्यंत संबंधित प्रशासनाच्या प्रमुखांनी या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे तसेच या प्रकरणी संबंधित बिट जमादारावर कारवाई करण्याऐवजी या ठाण्याचे ठाणेदार या अवैध धंद्यांना व हप्ता वसूली करणाऱ्या संबंधित बिट जमादारांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देत असल्यामुळे या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचही बीट मध्ये बिट जमादारांच्या हाप्तेखाऊ धोरणामुळे अनेक भागात अवैध गावठी दारू, देशी दारूविक्री, मटका, जुगार, तितली भवरा, प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटखा, अवैध प्रवासी वाहतूक आणि रेती तस्करी व रेतीचे साठेबाजी यांसारखे अवैध धंदे मोठ्या जोमाने सुरू आहेत हे सर्व अवैध धंद्ये पोलिसांच्या हद्दीत बिट जमादारांच्या नजरेखाली किंवा मूक संमतीने चालविले जात असुन या अवैध धंद्यांना ठाणेदार व स्थानिक बिट जमादारांचा आशिर्वाद असुन या बिट जमादाराना ठाण्याच्या ठाणेदारानी अप्रत्यक्षपणे पाठबळ देवुन मुकसंमती दिली की काय असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे.या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत असून सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठांनी कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रार कर्त्यानी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे त्यामुळे या परिसरात नेमके काय चालते हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहुधा माहिती नसते.त्याचा गैरफायदा येथील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घेत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक शासनाने केली आहे. मात्र पोलिसांनी या बेकायदा व्यवसायांकडे पूर्णपणे तन मनाने लक्ष ‌दिले आहे. वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात मटका जोमात सूरु आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल या मटक्‍यातून होत आहे. प्रत्येक पोलीस बिटमधील एक – दोन पोलीस कर्मचारी या मटक्‍यावर चांगलेच नियंत्रण ठेवून आहेत. या मटक्‍या बुकी कडून महीन्याकाठी ठरलेली मलिदा वेळेत वसूल होत असलेने कारवाई करण्यास वसंत नगर पोलिसाकडून टाळाटाळ होत आहे. आघाडी शासनाच्या काळात परिसरात मटका सुरु झाला की लगेच कारवाई व्हायची आता मात्र; वसंत नगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह सर्वच पोलीस कर्मचारी मूग गिळून गप्प आहेत.याकडे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेबांनी वेळीच लक्ष देवून या लाचखोर पोलिसांचा भांडाफोड करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close