पुसद तालुक्यातील मारवाडी खुर्द येथे सामाजिक कार्यकर्ते मनीष भाऊ शाह यांचा जाहीर सत्कर!

पुसद : तालुक्यातील माळ पठारावरील मौजा मारवाडी खुर्द येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असलेले सामाजिक कार्यकर्ते मनीष भाऊ शाह यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
समाजकार्यात निःस्वार्थ भावनेने झोकून देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा हा सन्मान गावकऱ्यांच्या कृतज्ञतेचे प्रतीक ठरला.मनीष भाऊ शाह हे नाव म्हणजे जनसामान्यांच्या विश्वासाचे केंद्रबिंदू. दवाखान्याची अडचण असो, गरजू कुटुंबातील लग्नकार्य असो, मंदिर बांधकाम असो किंवा कोणतेही जनहिताचे कार्य—लोक त्यांना आपुलकीने हाक देतात, आणि तेही तत्परतेने मदतीसाठी धावून जातात.याच सामाजिक जाणिवेतून, मारवाडी खुर्द येथील माता जगदंबा व संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने ग्रामस्थांनी बोअरवेलची मागणी मनीष भाऊ शाह यांच्याकडे केली. या मागणीला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःच्या स्वखर्चातून बोअरवेल उभारून दिली.दि. ३० मार्च २०२६ रोजी माता जगदंबा मूर्ती स्थापनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी बारामती येथील खोडे महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.या छोट्याखाणी कार्यक्रमात मनीष भाऊ शाह यांचे सहकारी व मित्र प्रा. बाबुसिंग भाऊ राठोड (मोहा) यांचाही शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मोहा येथील बाबाराव चव्हाण आणि प्रा. वसंत राठोड यांचेही स्वागत करून मान्यवरांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन रतन महाराज, अर्जुन राठोड आणि प्रमोद राठोड यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. त्यांनी आपल्या मनोगतातून मनीष भाऊ शाह यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.हा सोहळा केवळ सत्काराचा नव्हता, तर समाजहितासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला दिलेली आदरांजली होती. मनीष भाऊ शाह यांच्या कार्यातून समाजसेवेचा दीप अधिक तेजस्वीपणे प्रज्वलित होत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



