क्राइम

पुसद शहरात दहशतवाद विरोधी पथकांची मध्यरात्रीपासून १३ ठिकाणी छापेमारी!तरुणांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करणाऱ्यांचा डाव उधळला!

पुसद:शहरातील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पार्वती नगर परिसरासह १३ ठिकाणी एटीएसने धाडी टाकले आहे. तरुणांचा ‘ब्रेनवॉशिंग’ करून राज्यात घातपाती कारवाया घडवण्याच्या कट रचल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास ते दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या दुपारी १:००वाजेपर्यंत छापामारी करून धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.तर पुसद शहरातील पोलीस उपविभागासह व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसासह या वसंत नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱी आणि त्यांचा स्टाफ करतो तरी काय..? असा प्रश्न जनसामान्यातून विचारल्या जावु लागला आहे.

याबाबत ‘झेप न्यूज’ ला सूत्रानुसार मिळाल्या माहितीनुसार राज्यात घातपाती कारवाया घडविण्याचा कट रचला जात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून पुसद शहरात अनेक ठिकाणी धडक छापा टाकला होता.पुसद शहरात १३ ठिकाणी १३ पथाकाने खाजगी वाहनाने एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून, यामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली होती.पुसद शहरात वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १३ दहशतवाद विरोधी पथकाने वेढा घातल्याने ही यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे शनिवारी व रविवारी पाहावयास मिळाले आहे.दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली २० विशेष पथकांनी मध्यरात्री पुसद शहरात एन्ट्री केली. शहरातील तरुणांचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना दहशतवादी संघटनांकडे आकर्षित केले जात असल्याची गुप्त माहितीच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती आहे. या माहितीच्या आधारे पुसद शहरात अकोला येथील १३ पथकांनी एकाच वेळी१३ ठिकाणी छापा टाकून शोधमोहीम राबविण्यात आली असून डझनाहून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले अशी प्राथमिक माहिती आहे. दहशतवाद विरोधी पथकाने ही छापेमारी मोहीम अत्यंत गोपनीय ठेवल्याने या मोहिमेची स्थानिक पोलिसांनाही शेवटच्या क्षणापर्यंत याची कल्पना नव्हती. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयपीएस दर्जाचे अधिकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.राज्यातील तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून या तरुणांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करून त्यांना घातक कारवायांसाठी सक्रिय करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलल्या जात आहे. संशयितांचे काही आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का.? याचाही तपास सुरू आहे. जप्त केलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.सोबतच अनेक कागदपत्रे ताब्यात घेतले आहे.या दहशतवाद विरोधी पथकाने अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप कोणालाही रीतसर अटक केलेली नाही.आक्षेपार्ह साहित्य आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील पावले उचलली जातील,” असं दहशतवाद विरोधी पथकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्राकडून कळाले आहे. या कारवाईदरम्यान १३ जणांना सोडुन दिल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close