गावठी कट्टयासह आरोपी जेरबंद; पुसद शहर पोलिसात गुन्हा दाखल!

पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सेलू परीसरात गावठी पिस्तूल बाळगणार्या एका इसमास उपविभागीय पोलिस यांच्या पथकाने रेड कार्यवाही करून जेरबंद केले असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल,सह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. सय्यद मोसब्बीर सय्यद जमील (वय ३२ वर्ष) रा.डोंगरगाव ता.महागाव जि. यवतमाळ असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्राने ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, दि.९ डिसेंबर२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधिनस्त पथकाला मिळालेली खात्रीलायक माहिती अशी की, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेलु परिसरात एक इसम हा गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) घेउन शेलू येथे चारचाकी वाहनासह उभा आहे त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस पथकाली पंचासह जावुन रेड कार्यवाही करणे करीता आदेशित करतात करताच त्या आदेशानुसार पथक तात्काळ शेलू येथे गेले असता त्या ठिकाणी चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३१ ए.एच. २८२१ हुंदाई कंपनीची लाल रंगाची सॅन्ट्रो कार मध्ये असलेल्या इसमांस त्याचे नांव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सैयद मुसब्बीर सैयद जमील, वय ३२ वर्षे, रा. डोंगरगाव, ता. महागाव, जि. यवतमाळ असे सांगितले त्यावेळी पोलिसांनी त्याच्या वाहनाची झडती घेतली असता, ड्रायव्हर सीटच्या खाली एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) मिळून आला. सदर इसमाकडे अग्नीशस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे त्याने सांगितले. सदर इसम हा अवैद्यरित्या गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) बाळगतांना मिळून आला त्याचेवर शहद पो. स्टे. पुसद येथे अवैद्यरित्या अग्नीशस्त्र बाळगणे बाबत गुन्हांची नोंद करण्यात आला आहे.सदर अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या विरूध्द रेड कार्यवाही कुमार चिंता, मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ, अशोक थोरात, मा.अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार व हर्षवर्धन बी.जे. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग पुसद यांचे आदेशाने पोहवा / सुनिल मदने, शंकर टाळीकोटै, पोना / खुशाल चव्हाण, पोअं/ सैयद जुनैद अली यांनी ही रेड कारवाई केली आहे. त्यामुळे पोलीस उपविभागात कोणालाही कोणताही असा व्यक्ती जो अवैधपणे गावठी कट्टा (पिस्टल) अशा प्रकारचे शस्त्र बाळगतानां आढळून आल्यास किंवा दिसल्यास त्याची तात्काळ माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथे कळविण्याचे आवाहन पोलिसाच्या वतीने करण्यात आले आहे.अशा प्रकारची माहिती देणाऱ्याचे नावही गुप्त ठेवण्यात येईल.



