हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे अवमानास्पद विधान
कृषिमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही -शेतकरी नेते मनीष जाधव

पुसद/प्रतिनिधी: हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, असे कथित अवमानास्पद विधान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना केले आहे. त्यामुळे राज्याच्या कृषिमंत्री आणि राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी मागणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी केले आहे.महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात एक कथित अवमानास्पद विधान केले आहे. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला ते आज शुक्रवारी अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मात्र हे वक्तव्य अत्यंत संतापजनक दुर्दैवी व क्लेशदायक शेतकऱ्यांच्या आत्म सन्मानाला जिव्हारी लागणारं असल्यामुळे या महाभाग कृषिमंत्र्यांनी चक्क शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी केल्याने एका प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांची टिंगल टवाळगी करून शेतकऱ्यांच्या आत्म सन्मानावर आघात केला आहे राज्य आणि केंद्राच्या कृषिद्रोही शेतकरी विरोधी धोरणामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे माणिकराव कोकाटे या कृषिमंत्र्याचा या वक्तव्याचा मी एक शेतकरी म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो अविर्भाव व मस्तीत आलेल्या या कृषिमंत्र्याला अजित दादा समज देऊ कान टोचतील का ..? अल्पकाळामध्येच वादग्रस्त ठरलेल्या कृषिमंत्र्याला वेळीच समज द्यावी , नाहीतर याची मस्ती आम्हा शेतकऱ्याला उतरवावी लागेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक रुपयाचा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा मोठा गाजावाजा महायुती कडून केल्या गेला होता एक रुपया मध्ये पिक विमा योजना द्या…! यासाठी शेतकरी शासनाच्या दारात कधीच गेला नव्हता परंतु हे महायुतीचे सरकार शेतकऱ्यावर काही उपकार करत नाही लाखोंनी आम्हाला लुटलेल आहे या योजनेमध्ये बीड जिल्ह्यात काही चुकीचं झालं असेल तर चुकीच्या लोकांवर शासन निकषानुसार कारवाई व्हायला हवी , पण अशा पद्धतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला जिव्हारी लागणारी वक्तव्याच समर्थन राज्यातला कुठलाही शेतकरी करणार नाही छत्रपती शिवरायांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात फुले ,शाहू आंबेडकर , यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांच्या विचारावर चालणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या मंत्र्यांच्या वर्तनाने महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाल्याने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तात्काळ राज्यातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागवी अन्यथा कृषिमंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव प्रदेश प्रवक्ता स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.



