क्राइम

खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बकऱ्या चारणाऱ्या इसमाने विरीत उडी घेऊन केली आत्महत्या!

पुसद : तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वसंतवाडी मारवाडी जवळ दि.२५ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ९:००वाजण्याच्या सुमारास बकऱ्या चारणाऱ्या एका इसमाचा मृतदेह लगतच्या विहिरीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्यादि.२५ ऑक्टोंबर२०२४ रोजी सकाळी ९:००वाजण्याच्या सुमारास बकऱ्या चालणाऱा देवीसिंह भिका राठोड रा. वसंतवाडी या इसमाने मारवाडी जवळ रस्त्याच्या लगत असलेल्या शेतशिवारातील एका विहिरीमध्ये अचानक उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.परिसरातील अनेक नागरिकांनी त्याला बकऱ्या चारताना पहिली होते परंतु या इसमाने अचानक विहिरीमध्ये उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळतात खंडाळा पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन मृतदेह विहीरीतून बाहेर काढून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन साठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आत्महत्येचं कारण अस्पष्ट असले तरीही याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close