क्राइम

पुसद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी शोभायात्रेच्या मिरवणुकीतून समतेचे दर्शन!

पुसद : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी ८.३० वा. दरम्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने व शहरातील मान्यवर पत्रकार इत्यादी च्या वतीने मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले.
दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास भव्य शोभायात्रा निघाली.शहरातील विविध प्रभागातून अनेक अनुयायांनी डीजे लावून या शोभा यात्रेमध्ये कार्यकर्ते व महिला डोक्यावर निळे फेटे व गळ्यात निळे स्कार्फ घालून उत्साहाने सहभागी झाले होते. तर अबाल वृद्धांनी सुध्दा सहभाग नोंदविला होता.
 यंदाच्या जयंती उत्सवात मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले . अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने व मंडळांकडून थंड पाण्याची व खिचडीची सुविधा शोभायात्रेमध्ये सहभागी असलेल्या अनुयायांसाठी ठेवण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शोभायात्रा विविध भागातून एकत्र येऊन पुढे मार्गक्रमण करीत होत्या. नेताजी सुभाषचंद्र चौकात पुसद अर्बन कॉपरेटिव बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या मार्गदर्शनात सदभावना मंचच्या सदस्यांकडून शोभायात्रेमध्ये सहभागी असलेल्या मंडळाच्या अध्यक्ष व सदस्याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येत होता.
या शोभयात्रेची वैशिष्ट्य म्हणजे अबालवृद्धांसह तरुणाई डीजेच्या तालावर शोभा यात्रेत थिरकतांना दिसली ही शोभायात्रा कापड लाईन, नगीना चौक, आझाद चौक, राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक व परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन या भव्य शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला . यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. तर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत, दंगा विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक एपीआय ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक वडते, सर्व वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, महिला पोलीस उपनिरीक्षक, महिला पोलीस कॉन्स्टेबल, गृहरक्षक दलाचे जवानांनी चोख बंदोबस्त बजावला.ही शोभायात्रा राष्ट्रपुरुषांच्या ऐक्याचे दर्शन घडविणारी समतेची सम्यक ऐक्य मिरवणूक होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close