प्रवासी वाहनांच्या धडकेत माजी सरपंचासह शिक्षक ठार; मांडवा शिवारातील दुर्दैवी घटना!

पुसद:तालुक्यातील मांडवा येथील हनुमान मंदिराच्या कडेला दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या सकाळी ६ वाजताच्या दरम्यान माजी सरपंच व शिक्षक मॉर्निंग गेले होते.अशातच भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जाणाऱ्या मॅजिक वाहनाने जोरदार धडक दिली.त्या धडकेमध्ये माजी सरपंच व शिक्षक गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना दुर्देवी घटना घडली आहे.माजी सरपंच सुधाकर लालसिंग आडे वय ५८ वर्षे रा.मांडवा व नरेंद्र नामदेव धाड वय ५० वर्षे असे मृत्यू झालेल्याची नावे आहेत.नरेंद्र धाड हे उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील सम्यक दृष्टी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ओमकार गणेश चव्हाण वय १९ वर्षे रा.सावरगाव बंगला या चालकाविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.तर अपघात केल्याप्रकरणी माजी सरपंचाचा मुलगा शक्ती सुधाकर आडे वय ३८ वर्षे यांनी तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुधाकर व नरेंद्र हे नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजताच्या सुमारास सांडवा गावाबाहेरील रोडच्या कडेला मॉर्निंग वॉक करत होते.अशावेळी प्रवासी घेऊन जाणाऱ्या मॅजिक एक्सप्रेस वाहन क्रमांक एमएच २९,बीसी झिरो ०९५८ चा चालक ओंकार ने दोघांनाही निष्काळजीपणाने चालवून जोरदार धडक दिली.त्या धडकेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्यांना त्यांचा मुलगा शक्ती आडे ने येथील दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल केले होते. अशावेळी उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.मृत्यु झाल्याने परिसरात शोककळा पसरला आहे.चालका विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले असून वाहन व वाहन चालक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे.प्रकरणाचा अधिकार ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.



