पुसद तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी आशिष काळबांडे तर उपाध्यक्षपदी रणवीर टाले पाटील यांची बिनविरोध निवड!

पुसद: तालुक्यामधील सरपंच संघटनेच्या वतीने आज विश्रामगृहावर सभा घेण्यात आली या सभेमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये अध्यक्षांच्या कार्यकाळ व कारभार यावर हितगुज चर्चा झाली. मागील अध्यक्षांनी कोणत्याच विषयांमध्ये पुढाकार घेऊन संघटनेला चालना दिली नाही. किंवा कुठल्याही मागण्यांना न्याय दिला नाही. ते सरपंच भवन असो, विहिरीचा विषय असो, गोठ्यांचा विषय असो, घरकुल विषय असो किंवा प्रशासकाचा विषय असो सर्व कारभार ढेपाळला होता. याच कारणाने सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांना पायउतार करून पुनश्च आशिष काळबांडे यांनाच अध्यक्षपदावर विराजमान करण्यात आले. यापूर्वी आशिष काळबांडे यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला होता. पुनश्च त्यांना अध्यक्ष या पदावर नेमण्यात आले यावेळेस उपस्थितांमध्ये ६५ सरपंच असून सर्वच सरपंचांनी एकमुखाने आशिष काळबांडे यांची अध्यक्षपदी तर रणवीर टाले पाटील हे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष भाषणामध्ये आशिष काळबांडे यांनी सर्व सरपंचांना राहिलेली उर्वरित कामे आपण पंचायत समिती मार्फत व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सहकार्याने पूर्ण करून अशी आश्वासन दिले. सरपंच संघटनेला लागलेली कीड ती दूर करून नवीन जोशाने काम करू असे सांगितले. यापूर्वी सुद्धा आशिष काळबांडे यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलन करण्यात आले होते. याच कारणाने सर्व सरपंच संघटनेत आनंदाचे वातावरण असून अध्यक्ष उपाध्यक्ष यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देवून या पदाधिकाऱ्यांच्या हातातून ग्रामीण भागांत कामे पूर्ण होतील व सरपंच संघटनेला बल मिळेल अशी अपेक्षा सर्वांमध्ये जागृत झाली आहे.



