क्राइम

बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला, आत्महत्या की घातपात?; खंडाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद : खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव येथून रविवारपासून (दि.२३) बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावालगत एका विहिरीत मंगळवारी (दि.२५) दुपारी आढळला. भाग्यश्री गजानन अंभोरे(वय १५, रा.आडगाव असे मृत मुलीचे नाव आहे. भाग्यश्री हिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव येथील दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेली भाग्यश्री गजानन अंभोरे ही १५ वर्षीय मुलगी रविवारपासून घरात कोणाला काहीच न सांगता निघून गेली. मुलीचा शोध घेऊन अखेर तिच्या वडिलांनी दि.२३ जुलै २०२३रोजी खंडाळा पोलिस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. पालक आणि पोलिसांकडून शोध सुरू असतानाच,दि.२५जुलै २०२३ रोजी मंगळवारी दुपारी गावापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या एका विहिरींमध्ये भाग्यश्रीचा मृतदेह आढळला विहिरीत मुलीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली मृतदेह पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना मिळतात खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश चावडीकर आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून तो उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.शवविच्छदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला. तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या भाग्यश्रीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने पालकांना धक्का बसला. दरम्यान भाग्यश्रीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. खंडाळा पोलिसांनी तृतास मर्ग दाखल केला आहे. सदर घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश चावडीकर यांच्याकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close