पुसदच्या केदार जगताप ची अकोल्यात दमदार खेळी

पुसद ता.२३ : विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपुर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यात स्थानिकचा खेळाडू केदार कैलास जगताप यांचे केवळ दोन धावांनी पाठोपाठ शतक हुकले.
ता.२२ रोजी झालेल्या विजय तेलंग चषक स्पर्धेतील एक दिवसीय सामन्यात केदारने ९९ चेंडूत १६ चौकारासह १०७ धावा केल्या होत्या. आज ता.२३ फेब्रुवारी ला अकोला संघा विरुद्ध अकोला येथे सुरू असलेल्या सुरू असलेल्या खैरागड चषक साखळी सामन्यात केदार जगतापचे अवघ्या दोन धावानी शतक हुकले. सलग दुसऱ्या दिवशी आपली कप्तानी पारी खेळत असताना त्याने दोन विकेट घेतल्या. तसेच सलामीला करीत असलेल्या फलंदाजीत तो ७७ चेंडूत ९८ धावावर झेलबाद झाला. पहिल्या दिवशीच्या खेळात अकोला संघ १९४ धावाच काढू शकला तर यवतमाळ संघाची २ बाद १८१ अशी मजबूत स्थिती होती. सदर सामने दोन गटात सुरू असून अ गटात बुलढाणा अमरावती यवतमाळ वाशीम अकोला तर ब गटात गडचिरोली वर्धा भंडारा नागपुर गोंदिया व चंद्रपूरचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्याचा संघ व्हीसीएचे जिल्हा समन्वयक बाळू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.



