दगडाने ठेचून निर्घुण हत्या करणाऱ्या हात्याकांडातील तिन आरोपींना अटक;पुसद डी.बी.पथकांची मोठी कामगिरी!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कवडीपूर येथे जुन्या वादातून संघदिप संजय भगत ह्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करून आरोपी पसार झाले होते. त्या निर्घुण हत्याकांड प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे पुणे वाघोली वाघेश्वर मंदिर परिसर भागातुन अटक करण्यात आले आहे. सदर आरोपी पैकी आरोपी अ.क. १) रोशन दिलीप जोगदंडे वय २३ वर्ष, रा. भिमनगर पुसद, २) आशिष आशोक सुर्यवंशी वय २३ वर्ष, रा. भिमनगर पुसद, ३) वैभव बापुराव टेंबरे वय २१ वर्ष, रा. बोरगडी पुसद जि.यवतमाळ असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २० जुलै २०२३ रोजी रात्री ०८.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बाळू आनंदा भगत वय ४२ वर्ष, रा. श्रीरामपूर पुसद जि. यवतमाळ यांनी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली की, फिर्यादीचा पुतण्या संघदिप संजय भगत वय २३ वर्ष, यांस कवडीपूर येथील बजरंग नगर पाण्याच्या टाकीजवळ आरोपी १) प्रवीण सुर्यवंशी २) भुषण जोगदंडे, ३) आशिष सुर्यवंशी ४) वैभव टेंबरे ५) रोहन जोगदंडे असे सर्वांनी मिळून संगणमत करून जुन्या वादाचे कारणावरून डोक्यात दगड घालून जिवाने ठार मारले त्या फिर्यादी वरून पोलिसांनी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध अप.क्र. ५८४ /२०२३ कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९ भा. द. वी. अन्वेय गुन्हे दाखल करण्यात आले होते.सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर यांनी सदर गुन्हयाचे तपास कामी पुसद ग्रामीण पथक, स्थानिक गुन्हे शाखा पुसद पथक व पसद शहर डि.बी. पथक अशी वेगवेगळी तिन पथके तयार करून शोधकार्यासाठी रवाना करण्यात आली. सदर गुन्ह्यांचा तपास करत असतांना पुसद शहर डि.बी. पथकाला आरोपी हे पुणे येथे असल्याची खात्रीलायक माहीती मिळाल्याने त्याबाबत अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर यांना माहिती दिली त्यांच्या आदेशानुसार पुसद शहर डि.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो. हवा. प्रफुल इंगोले, पो. कॉ. शुध्दोधन भगत, पो.कॉ आकाश बाभूळकर, पो.कॉ वैजनाथ पवार यांचे पथक दि. २१जुलै२०२३ रोजी मध्यरात्री पुणे करीता रवाना झाले. त्यावेळी पुसद शहर डी. बी. पथकाने सदर आरोपींचा पुणे शहरांत विविध ठिकाणी आतिशय जिद्दीने व चिकाटीने शोध घेतला असता, सदर आरोपी पैकी आरोपी अ.क. १) रोशन दिलीप जोगदंडे वय २३ वर्ष, रा. भिमनगर पुसद, २) आशिष आशोक सुर्यवंशी वय २३ वर्ष, रा. भिमनगर पुसद, ३) वैभव बापुराव टॅबरे वय २१ वर्ष, रा. बोरगडी पुसद जि.. यवतमाळ. हे पुणे वाघोली येथील वाघेश्वर मंदीर परिसरात असल्याचे समजल्याने सापळा रचून अतिशय कौशल्यपूर्ण रितीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शहर लोहकरे व डि.बी.पथक हे आरोपीतांना घेवून आज रोजी पुसद येथे दाखल झाल्याने पुढील तपास कामी सदरचे आरोपी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड साहेब अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब, सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पुसद शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर,सहा.पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, सहा. पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांचे सुचनेनुसार डी. बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो. हवा. प्रफूल इंगोले, पो. कॉ. शुध्दोधन भगत, पो. कॉ. वैजनाथ पवार, पो.कॉ. आकाश बाभूळकर यांनी केली आहे.



