चोरी गेलेल्या ऑटोरिक्षासह अखेर चोरटा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

पुसद: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विहार गेस्ट हाऊस लॉजिंग समोर धुंदी येथील फिर्यादी हेमराज शेषराव राठोड यांनी आपला ऑटो रिक्षा क्रमांक एम एच – २९ टीसी ६०पार्क केला असताना आज्ञा चोरट्यांनी हा ऑटो चोरीला गेल्याची फिर्याद १ जुलै रोजी शहर पोलीस पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला.त्यावेळी स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी अधिनस्त पथकांना सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद यांनी उपविभागात सदरील आरोपीचा व इतर गुन्ह्यांचा तपास करण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सुत्रांच्या माहिती नुसार माहितीनुसार आरेगाव फाटा येथे एक इसम संशयास्पद रित्या आढळला त्यास पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील ऑटोरिक्षा बाबत विचारणा केली असता त्याने पुसद येथून ऑटो रिक्षा चोरला असल्याची कबुली दिली त्याच्याकडून ऑटो रिक्षा क्रमांक एमएच २९ टीसी ६० जप्त करून आरोपी नरेंद्र विष्णू २८ दुतकर रा. कापेश्वर ता. आर्णी याला जेरबंद करून पुढील कारवाई करिता शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.



