Uncategorized

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आई बनून अध्यापन करावे-प्रा. गजानन जाधव

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाची सांगता

पुसद: असे म्हणतात की,मायेच्या स्तरावर जाऊन शिकवतो तो मास्तर याला भारतीय संस्कृतीत आधार प्राप्त झालेला आहे ज्ञानदान करणाऱ्या व्यक्तीला ज्ञानेश्वर माऊली,पंढरीच्या विठ्ठलाला विठू माऊली असे संबोधल्या जाते यावरून शिक्षकांनी विद्यार्थ्याची आई बनून अध्यापन करावे तेव्हाच ते अध्यापन प्रभावी व फलदायी होईल असे मार्मिक उद्गार रासेयो जिल्हा समन्वयक प्रा गजानन जाधव श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद यांनी काढले. ते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन केंद्र पुणे अंतर्गत यवतमाळ जिल्हा कार्यालय व पंचायत समिती पुसद च्या वतीने आयोजित तीन दिवशीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण समारोपीय कार्यक्रमात आढावा घेताना बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य संजय पद्मावार, जिल्हास्तरीय तज्ञ प्रशिक्षक शिवशंकर घरडे ,तज्ञ प्रशिक्षक डॉ. आशिष देऊरकर ,दीपक सरकटे ,बीआर सी चे रोगे विचार पिठावर उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा भास्कर गरड ,प्रा संतोष चव्हाण ,अशोक पोले ,किशोर गांजरे, मोटे, दिलीप ठाकरे ,सय्यद यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून विविध प्रकारचे तास घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण दिले. प्रा गजानन जाधव पुढे म्हणाले की शालेय नेतृत्व तयार करताना विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्व,नेतृत्व व वक्तृत्व ही गुणमूल्य शिक्षकांनी निर्माण केले पाहिजे , त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने आपले विचार बदलले पाहिजे कारण आपले विचार हे विद्यार्थांचे नशीब बदलू शकते म्हणून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आईच्या स्तरावर जाऊन अध्यापन करावे .तो तुम्हाला मुलाचा आनंद देऊन गेल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत आपला विद्यार्थी सर्वांग सुंदर बनिवणे हे शिक्षक वृद्धी प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे असे ते शेवटी म्हणाले .एका सुंदर कवितेने त्यांनी आपल्या आढावा मनोगताची सांगता केली. संजय पद्मावार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सर्व तज्ञ मार्गदर्शकाचे अभिनंदन केले व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी येणाऱ्या काळात प्रवाह बरोबर चालण्यासाठी अपडेट असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी शिक्षक वर्मा, ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन किशोर गांजरे यांनी तर उडाखे मॅडम यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने या तिसऱ्या प्रशिक्षण टप्याची सांगता झाली.यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक, शिक्षीका व बी आर सी टी टीम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close