क्राइम

अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्या दोन आरोपींस अटक; अडीच लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना!

पुसद :ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येलदरी फाट्यावरून शहराकडे एक इसम दुचाकीने अवैधरित्या गांजा नैसर्गिक अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळाली होती त्यावेळी या पथकाने सापळा रचून त्या संशयितास थांबवून सखोल चौकशी केली व त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गांजा नैसर्गिक अमली पदार्थांचे पाकीट मिळुन आले त्यावेळी त्याला अवैधरित्या गांजा बाळगल्याप्रकरणी दोन आरोपीना  पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून सुमारे ८.७०० वजन कीमत अंदाजे २ लाख१७ हजार५०० रुपयांचा गांजा तसेच एक जुनी दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण २लाख८७हाजर ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ला दिलेली माहिती अशी की,पुसद पोलीस उपविभागातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य धंदयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पोलीस पथक सरसावले आहेत. अंमली पदार्थ विरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येलदरी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक उघडकीस आली आहे. अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता सा. यांनी आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने दिनांक १६ में२०२६ रोजी पुसद उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला खबऱ्या व्दारे गोपिनीय माहीती मिळाली की, ग्राम येलदरी कडून पुसद कडे एक ईसम दुचाकीवरून प्रतिबंधीत गांजा आमंलीपदार्थ वाहतूक करणार असल्याची वर्दी मिळाली होती त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला त्यावेळी एक संशयीत ईसम दुचाकी क्रं. एम.एच. २६ सि.एच. २००३ हा खंडाळा वरून पुसद कडे येत असतांना येलदरी फाटा येथे दिसून आल्याने त्यास थांबवून त्यास नाव, गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव, पत्ता ०१. शेख जाकीर शेख जाफर वय ३५ वर्ष रा. रहीमनगर, उमरखेड ह.मु. माहूर पोलीस स्टेशन जवळ, माहूर, जि. नांदेड असे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्याची दुचाकीची झडती घेतली असता झडती दरम्यान त्याच्याकडे गांजा पाकीटे मिळून आले तसेच त्यास गांजा कोठून आणला अशी विचारणा केली असता त्याने शेख ऐजाज रा. वाशिम यांचे कडून आणला असून त्याचे जवळ तो अनसिंग येथे असून त्याचे जवळ अजून गांजा असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिस थेट वाशिम जिल्ह्यातील शेलू बु. येथे जावून शेख सलीम एजाज अब्दूल सईद, वय ३८ वर्ष रा. मंगलवारी बेस, वाशिम, यास ताब्यात घेवून त्याचे जवळील टि.व्ही. एस. क्र.एम.एच. ३७ ए.सि. ९५६२ गाडीची झडती घेण्याबाबत सांगून त्यांचे गाडीत सुध्दा अवैधरीत्या गांजा बाळतांना मिळून आला. सदर ईसमास गांजा कोठून आणला याबाबत विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने अब्दुल अजीस अब्दुल मज्जीद रा. वाशिम यांचेकडून आणला असल्याचे सांगितले.तरी आरोपी नामे ०१. शेख जाकीर शेख जाफर वय ३५ वर्ष रा. रहीमनगर, उमरखेड ह.मु. माहूर पोलीस स्टेशन जवळ, माहूर, जि. नांदेड, ०२. शेख सलीम एजाज अब्दुल सईद, वय ३८ वर्ष रा. मंगलवारी बेस, वाशिम, यांचे झडतीमध्ये एकुण निव्वळ गांजा एकूण वनज ८.७०० की अं. २१७५०० रु., टि.व्ही. एस कंपनीची मो.सा. कं.एम.एच. ३७ ए.सि. ९५६२ व जुनी वापरती पांढ-या रंगाची होंडा नाव लिहीलेली मो.सा.क्र.एम.एच. २६ सि.एच. २००३ दोन्ही मोसा की. अं. ६०,००० रु., जूना वापरते मोबाईल Vivo Y16 व Oppo A3x 5G Model CPH2681 असे दोन्ही मोबाईलची की. १०,०००/- रु.असा एकूण २८७५०० रु.चा मुद्देमाल अवैधरीत्या बाळगतांना मिळून आल्याने जप्ती पंचनाम्याप्रमाणे पंचासमक्ष जप्त करून एन.डी.पि.एस. ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता सा.मा. अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात सा.मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ सतीश चवरे यांचे मार्गदर्शनात तसेच सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद बि. जे. हर्षवर्धन सा., यांचे अवलोकनार्थ सहा. पोलीस निरीक्षक श्री. आशिष चौधरी, पोउपनि राहूल देशमूख,, दिपक उईके, सफो शेख मसूद, पोहेका / सुनिल मदने, दिपक अरगडे, रविंद्र गावंडे, नाना मस्के, पो. अं. शेख जूनेद, पराग गिरनाळे, नरेश नरवाडे, ईरफान अगवान, कल्पना रबडे, गौतम आठवले, नेमणुक पो. स्टे. पुसद ग्रामिण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच तरुण पिढीला अमंलीपदार्थाचे विळख्यातून वाचविण्यासाठी पोलीस प्रशासन कटीबध्द असून पोलीस उपविभागाच्या हद्दीत कुठेही अवैधरित्या गांजा कीवा ईतर अमंली पदार्थाची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास नांगरीकांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close