ईतर

भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी गजानन हिंगमिरेची नियुक्ती

पुसद:भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. त्यामध्ये पश्चिम विदर्भातून गजानन हिंगमिरे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.ह्या अगोदर हिंगमिरे हे भाजपा किसान मोर्चा पुसदचे शहराध्यक्ष होते.त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये भरपूर निवेदन देऊन आंदोलन केले.त्यांच्या त्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भेगडे यांनी यांच्यावर विश्वास दाखवून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी,किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली.तसे जाहीर करण्यात आले.पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे.त्या विश्वासास आपण आगामी काळात पात्र ठराल अशी अपेक्षा आहे. आपल्या हातून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या समस्या सुटण्याकरता योग्य ते प्रयत्न होतील असा विश्वास वाटतो.आपण पूर्ण वेळ भाजप किसान मोर्चा करता झटून काम करावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भेगडे ह्यांनी दाखवला.नवनियुक्त भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हिंगमिरे यांच्या निवडीचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर व राज्यसभा सदस्य खासदार अनिल बोंडे व भाजपा आमदार निलय नाईक,जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे तसेच सुधाकर गीते,अमर दिनकर यांना देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close