शैक्षणिक

श्री. शिवाजी विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

पुसद : फेब्रु/मार्च- २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा (ई. १० वी) निकाल नुकताच ऑनलाईन घोषित करण्यात आला. त्यामधे स्थानिक श्री. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद चा निकाल ९१.७८ टक्के लागला आहे. यामध्ये कु धनश्री संतोष होलगरे ९३.६० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम आली आहे. तर कौतुक युवराज चव्हाण ९२.४० टक्के गुण मिळवून द्वितीय व कु. गौरी नंदकुमार खरे ९१.६० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. परिक्षेला एकूण २८० विद्यार्थ्यी बसले होते त्यापैकी २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ३९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली असुन प्रथम श्रेणीत ८२ तर द्वितीय श्रेणीत १०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यात कु. धनश्री संतोष होलगरे ९३.६० टक्के, कौतुक युवराज चव्हाण-९२.४० टक्के, कु. गौरी नंदकुमार खरे -९१.६० टक्के, कु. समिक्षा संजय जामकर – ८९.६० टवके, आर्यन शैलेश चंदेल ८९.८० टक्के, शशांक धीरेन्द्र मुळे ८९.८० टक्के, कु. संस्कृती अशोक सरकटे – ८७.८० टक्के, सोहम रामभाऊ देशमुख – ८६.४० टक्के, वैभव निलेश पवार ८६ टक्के, ओम ज्ञानेश्वर मार्कड ८५.६० टकके हे सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यी आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री. शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरूध्द पाटील चोंढीकर व सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. मुख्याध्यापक रामचंद्र हिरवे, उपमुख्याद्यापक दत्तात्रय जीवने, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close