पुसद येथील हजरत उमर फारूक (रजि)उर्दू हायस्कूलची सलग २३ वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.!

पुसद:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा परिषद पुणे मार्फत, सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दाहवीच्या परीक्षेत पुसद येथील हजरत उमर फारूक (रजि) उर्दू हायस्कूल निकालाची परंपरा कायम ठेवत यवतमाळ जिल्यातील एक नामांकित शाळा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.शाळेमधून एकूण १९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून ६० विद्यार्थिनी विशेष प्राविण्य गुण प्राप्त केले आहे ७४ विध्यार्थी प्रथम श्रेणी तसेच ४७ द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये कु. इफरा तहेरीम गुलाम नबी शेख ९४.००%, कु.मारिया ऐमन अन्सार अहमद ९३.४०%, कु.अफिरा फातेमा लाईक अहमद ९३.००%,खुतेजा अहेवार वाहिद मिर्झा ९२.२०%,आसमीर खान सलीम खान ९१.००%,कु.उम्मे हबीबाह अब्दुल हमीद ९१.००%,फातेमा तबसूम जमील शाह ९०.२०%,फौझान अली इम्रान अली ८९.४०%,कु.मर्जूका मुदस्सीर शेख ८९.००%,कु. जुबिया नाज सय्यद इर्शाद ८८.२०%,हस्सान ताहमी रहमतुल्ला खान ८८.००%,कु.सना फिरदोस एजाज खान ८७.४०%,कु. सनाया सदीम नासिर अहमद ८७.४०%, कु.फरिसा खानम मो. शम्स नवेद ८६.४०%, कु.नौशीन खानम नसरुल्लाह खान ८७.००%, मारिया जावेद मोहम्मद ८६.००%गुण प्राप्त करून पुसद तालुक्यात शाळेचे नाव उज्वल केले आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक मो. वकील सर माध्य व उच्च माध्य विद्यालय, याह्या खान सर प्राथ.व उच्च प्राथ शाळा) *वर्ग शिक्षक अब्दुल करीम सर , फहिमोद्दीन सर मो. जुनेद सर व सर्व शिक्षकवृंदानी केले.



