मोठी बातमी! राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मातोश्री माजी नगराध्यक्षा अनिताताई नाईक यांनी कोट्यावधीचा शासकीय भूखंड हडप करून विक्री केल्याचा खळबळजनक आरोप.!
संबंधित विभागासह पोलीसात तक्रार दाखल पुसद न.प.चे नगरसेवक डॉ .मोहम्मद नदीम यांची पत्रकार परिषदेत माहिती!

पुसद : राज्याच्या सरकारमधील साहा खात्याचे राज्यमंत्री असलेले ना. इंद्रनील नाईक यांच्या मातोश्री पुसद नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.अनिताताई मनोहरराव नाईक यांनी शहरातील गांधी नगर भागात गृहनिर्माण सहकारी संस्थेने सन१९६८-६९ साली शेत सर्वे नं.१३२ मधिल क्षेत्रात तयार केलेल्या ले-आउट मधील शासकीय भूखंडावर ताबा करून भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री केल्याचा खळबळ जनक आरोप काँग्रेसचे नेते डॉ.मोहम्मद नदीम यांनी केला आहे. तर या शासकीय भूखंड घोटाळ्याची तक्रार जिल्ह्यधिकाऱ्यासह वसंत नगर पोलीसात दाखल केली असल्याची माहितीआज ३:३०वाजण्याच्या सुमारास डी.एन. कॉम्प्लेक्स वाशिम रोड पुसद येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली असून शासकीय (सरकारी) भुंखडावर बेकायदेशीर कब्जा करून किंवा बनावट कागदपत्रे तयार करून तिची विक्री केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेले पुसद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी ( सुनेत्रा पवार)पक्षाचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक यांच्या मातोश्री पुसद नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ अनिताताई मनोहरराव नाईक यांच्यावर शासकीय भूखंड हडप करून विक्री केल्याचा जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानं मतदारसंघात खळबळ उडाली आहे.आजच्या बाजारभावाप्रमाणे या जमिनीच्या भुंखडाची कींमत कोट्यावधी आहे.वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या या कुटुंबानी हा शासकीय भूखंड लाटला असुन अंदाजे ५ कोटीर रुपयांत हा भुंखडाचा (जागा) तुकडा स्वतः सौ.अनिताताई मनोहर नाईक यांनी विक्री केला आहे.पुसद नगर परिषदेच्या हद्दीतील शेत सर्वे नं. १३२ मधील गांधी नगर ले -आउट मधील रस्ता आणि खुली जागा कींमत अंदाजे २० ते २५ कोटी किमतीच्या शासकीय जागेवर अतिक्रमन केलेलं आहे त्यातील जागा स्वतः अनिता मनोहर नाईक यांनी भुमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून बेकायदेशीररित्या कागदपत्रे तयार करून विक्री करण्यात आली आहे.
शासकीय (सरकारी) जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून किंवा बनावट कागदपत्रे तयार करून तिची विक्री करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ आणि भारतीय न्याय संहिता (पूर्वीचा IPC) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी वसंत नगर पोलीसात तक्रार दाखल केली आहे. ही शासकीय भुखंडावर २०२३ साली तत्कालीन मुख्यअधिकारी किरण सुकलवाड यांनी बांधकाम परवानगी सुद्धा दिलेली आहे. बांधमाक परवागी अर्जदाराने सुद्धा आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नसताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीने प्रशासकीय काळात नगर परिषदेने परवागी देण्यात आलेली आहे, या परवानगी आक्षेप सुद्धा घेतला होता तसेच मुखाधिकाऱ्याच्या निदर्शनास सुद्धा आणून दिले त्यावेळी सदर परवानगी अनावधाने दिल्यागेली असल्याचे मुखाधिकाऱ्याने लेखी स्वरूपात दिले होते.त्यावेळी तशी तक्रार जिल्ह्यधिकाऱ्याकडे सुध्दा दाखल केली होती त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर चौकशी सुरु केली होती. परंतु नाईक कुटुंबियांनी सत्तेचा दुरुपयोग करून अतिक्रमण करून अवैधरित्या शासकीय भूखंडाची (जागेची)विक्री केली व अवैधरित्या शासकीय जागा आणि रस्त्यावर अतिक्रमण केले ते त्वरित काढून घ्यावे व रस्ता मोकळा करून द्यावा, आणि ह्या जागा नगर परिषदेच्या ताब्यात सुध्दा घाव्या अशा आशियाचे निवेदन मुख्यअधिकारी आणि नगराध्यक्षा पुसद यांच्या कडे दाखल केलेआहे.शासकीय जागेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही नगराध्यक्षाची असते मात्र रक्षकच भक्षक बनत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय.? ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच अतिक्रमणं कींवा त्यांच्याच कुटुंबातील लोक अतिक्रमण करून शासकीय भूखंड जागा बळकावत असतील तर पुसद शहर अतिक्रमण मुक्त होणार कसे पुसद नगरपरिषदेकडे जवळपास ३०ते ४०कोटी सार्वजनिक मलमत्ता आहे मात्र या मालमत्तेकडे संबंधित प्रशासने लक्ष देण्याची गरज आहे मात्र जे लोक सत्तेत आहेत तेच लोकप्रतिनिधीच या शासकीय मालमत्तेची वाटलावत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा त्यामुळे शासकीय (सरकारी) जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून किंवा बनावट कागदपत्रे तयार करून तिची विक्री करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी डॉ. मोहम्मद नदीम यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.मात्र हे जमीन घोटाळा उघडकीस आला असला तरीही या प्रकरणी संबंधित प्रशासन आता कारवाई काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या पत्रकार परिषदेला काँग्रेस जेष्ठ नेते नगर सेवक डॉ.मोहम्मद नदीम, शहराध्यक्ष झिया शेख, नगरसेवक ऍड. वसीम अहेमद,नगरसेवक जब्बार लाखे,तहेसीन अहेमद, मसूद मिर्झा,गाझी ओसामा, इर्शाद कुरेशी, फिरोज खान हे उपस्थित होते.



