ईतर

महसूल दिनानिमित्त लोकाभिमुख कार्य करणाऱ्या अधिकाऱी व कर्मचाऱ्याचा गौरव !

पुसद:आजच्या बदलत्या युगात, माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या संकल्पना, माध्यम बदल आहेत. अशा या काळात पुसद महसूल विभाग अधिकरित्या लोकाभिमुख कार्य करत असुन महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱी जनसेवेवर भर देत नागरिकांना सेवा देण्याचे काम अविरतपणे करीत असल्याने महसूल दिनानिमित्त आशिष बिजवाल उपविभागीय अधिकारी

तसेच महसूल कर्मचारी दिलीप कोलेवाड यांच्या कार्याचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून ते आधुनिक प्रशासनापर्यंत महसूल विभागाने लोकाभिमुख शासनव्यवस्थेचा कणा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि शासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत आहे. या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ‘महसूल दिन’चे औचित्य साधून म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जतो. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हाधिकारी अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील महसुल कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टं अधिकारी व कर्मचारी यांनी वर्षभरात शासकीय कामे, निवडणुक, नैसर्गीक आपत्ती, शासकीय वसुली, या सारख्या शासकीय कामकाज व ईतर प्रशासनामध्ये उल्लेखनिय काम केल्याबाबत जिल्ह्यातून उत्कृष्ट पुसद येथील कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी आशीष बिजवल यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर उत्कृष्टं सहायक महसूल अधिकारी म्हणून तहसील

कार्यालय पुसद येथील दिलीप कोलेवाड, राज्य अध्यक्ष महसूल कर्मचारी सघटना महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी व जिल्हापोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे दि.३ ऑगष्ट २०२६ रोजी शाल, श्रीफळ, व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close