पुसद विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; माधवराव वैद्य यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी जाहीर!

पुसद:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसद विधानसभा मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी माधवराव वैद्य यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघात विधानसभेसाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. पुसद म्हणजे नाईक घराणे असे समीकरणच तयार झाले होते. वर्षानुवर्षे नाईक घराण्याची सत्ता या मतदारसंघात असून सध्याचे आमदार माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे धाकटे पुत्र इंद्रनील नाईक हे सध्याचे आमदार होते. तरी या मतदारसंघाचा फारसा विकास झालेला नाही.आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघात तांडा वस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था, सूतगिरण्या व कारखाने बंद झाल्यामुळे रोजगाराचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.नाईक घराण्याला वगळून पुढे जाता येत नाही.. नाईकांना इथे दैवत मानले जात असल्यामुळे त्यांना राजकीय प्रतिस्पर्धी निर्माण झालेला नाही. परंतु या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर नाईक बंगल्यातच उमेदवारीसाठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. थोरले की धाकटे? असा पेच नाईक कुटुंबात निर्माण झाल्याची चर्चा सुरू असताना या मतदारसंघात राजकीय भूकंपाचे हादरे बसू लागले असून मोठ मोठ्या नाट्यमय घडामोडी घडवू लागल्या आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तिकीट शरद मैद यांना जाहीर झाले आहे तर महाविकास आघाडी कडून तिकिटासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य यांनी तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी व एबी फॉर्म मिळविला आहे.आदिवासी समाज नव्हे तर इतर सर्व समाजाला सोबत घेऊन माधवराव वैद्य ही निवडणूक लढविणार आहेत आज अधिकृतपणे वंचित आघाडी पक्षाकडून उमेदवारी घोषित झाल्यानंतर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच भ्रमणध्वनीवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी कींवा चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने महायुतीच्या उमेदवाराची दमछाक होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.



