ईतर

पुसद अर्बन बँकेची ४०वी आमसभा संपन्न!

पुसद:संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेची ४० वी आमसभा बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या अध्यक्षतेखाली पुसद च्या साई मंगलम मध्ये उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला तसेच हरित क्रांती चे प्रणेते स्व.वसंतराव नाईक व स्व.आप्पाजी आसेगावकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर अहवाल वर्षातील सर्वच क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतरबँकेचे अध्यक्ष शरद मैंद, उपाध्यक्ष राकेश खुराणा,जेष्ठ संचालक के. आय. मिर्झा,ललित सेता,निळकंठ पाटील, बाळासाहेब पाटील,विनायक डुब्बेवार,प्रवीर व्यवहारे, अविनाश अग्रवाल (उमरखेड ),सुनिल चव्हाण, रंजित सांबरे, राजश्री सुधीर देशमुख (दिग्रस ) यांच्या सह स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रशांत चिंतावार,शेषराव पोले, सत्यजित देशमुख,कौस्तुभ धुमाळे,सुनील टाक,शिरीष लोखंडे यांनी प्रमुख उपस्थित पाहुणे वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नारायण क्षीरसागर सर, जेष्ठ नेते व मार्गदर्शक साहेबराव ठेंगे, पुसद अर्बन बँक सामाजिक उपक्रम समिती सदस्य के.जी.चव्हाण, शिवसेना जिल्हाध्यक्ष ॲड.उमाकांत पापिनवार, पुसद चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुरज डुबेवार, मनसे जिल्हाध्यक्ष अभय गडम, स्व.शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग पुसद चे मॅनेजिंग डायरेक्टर शरद पाटील, जिनिंग प्रेसिंगचे संचालक दीपक दादा जाधव, कृषि उत्पन्न बाजार समिती पुसद चे संचालक यशवंत चौधरी, बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी संचालक एड. नैय्यर खान , पुसद अर्बन ऑप बँक चे. माजी उपाध्यक्ष सुधीर देशमुख( दिग्रस )भारती मैंद पतसंस्था तज्ञ संचालक मधुकरराव घड्याळे, जिनिंग प्रेसिंगचे संचालक संजय लोंढे, पुसद नप कर्मचारी संघटना अध्यक्ष गणेश डांगोरिया यांचे स्वागत केले. त्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. तर सभाअध्यक्ष शरद मैंद यांनी आर्थिक वर्षाचा अहवाल वाचन करतांना बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देत चालू आर्थिक वर्षात बँकेला ५कोटी ९ लाख २५हजार रु चा नफा झाल्याचे तसेच संचालक मंडळाने यंदाच्या वर्षी देखील सर्व सभासदांचा १लाखाचा अपघात विमा लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे तसेच आत्ता पर्यत ५८ सभासदांचे क्लेम कंपनी कडून सभासदांच्या वारसांना देण्यात आल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सुरवातीचे संचालन मनिष अनंतवार यांनी तर उपाध्यक्ष राकेश खुराणा यांनी आभार व्यक्त केले.आमसभेचे कामकाज संपताच अमरावती येथील भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्रा चे प्रभारी प्राचार्य गजानन आर. गवई यांनी प्रशिक्षण दिले.सभेला महिला पुरुष सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close