क्राइम

पुसद शहरात अवैध सावकाराच्या घरासह किराणा दुकानावर धाड ; सहकार विभागाची कारवाई!

सहकार विभागाच्या या कारवाईमुळे पुसद शहरातील अवैध सावकाराचे धाबे दणाणले!

पुसद: शहरातील वाशिम रस्त्यावरील अवैध सावकाराच्या राहत्या घरावर तसेच किराणा दुकानावर जिल्हा निबंधक (सावकारी) यवतमाळ यांच्या आदेशानुसार सावकारी झडती पथकाने धाड टाकून झडती घेतली असता घर व किराणा दुकानात मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारीच्या अनुषंगाने खरेदी विक्रीचे दस्तऐवज कोरे बाँड,कोरे धनादेश नोंदी असलेल्या डायऱ्या, चिठ्या असे एकुण ५८ दस्तऐवज जप्त करण्यात आले असून सदर कागदपत्रे व दस्तावेज यांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी (नियम) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार गैर अर्जदारावर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याने शहरात सहकार विभागाच्या या कारवाईने सावकारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

याबाबत सहाय्यक निबंधक सावकारी झडती पथकाने दिलेली माहिती अशी की,अर्जदार वैभव गोधाजी बोरकुट रा.लोणी ता.पुसद जि. यवतमाळ यांनी दि. १७ मार्च २०२५ रोजी सावकाराचे जिल्हा निबंधक यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केला होती त्यामध्ये गैरअर्जदार हे बेकायदेशीर सावकारी करीत असून अवैध सावकारीच्या व्यवहारात शेत जमिनीचे खरेदीखत लिहुन घेतले असुन ते रद्द करुन मिळणे व गैरअर्जदाराविरुध्द फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्याकरीता झडती पथकाने आज दि.४ एप्रिल २०२५ रोजी गैरअर्जदार अनिल मधुकर गडम यांच्या घरासह किराणा दुकानाची झडती घेतली असुन झडती दरम्यान कोरे बाँड, कोरे चेक, खरेदीखत, नोंदी असलेल्या डायऱ्या, चिठ्या असे एकुण ५८ कागदपत्रे / दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. सदर कागदपत्रे व दस्तांची पडताळणी करुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येणार आहे.सदरची संपूर्ण कारवाई ही मा. जिल्हाधिकारी यवतमाळ तथा अध्यक्ष, जिल्हा सनियंत्रण समिती, मा.पोलिस अधिक्षक यवतमाळ आणि जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांचे मागदर्शनात दोन पथके निर्माण करण्यात आली होती. केशव मस्के, सावकाराचे सहाय्यक निबंधक दिग्रस व सुनिल भालेराव, सावकाराचे सहाय्यक निबंधक पुसद यांची पथक प्रमुख म्हणून काम पाहीले. सदर दोन पथकामध्ये अनिल सुरपाम, सहकार अधिकारी पुसद, संजय पिंपरखेडे, सहकार अधिकारी उमरखेड, जि.पी. राठोड सहकार अधिकारी श्रेणी-१ दारव्हा, श्रीमती सविता चांदेकर, सहकार अधिकारी कळंब, चेतन राठोड सहकार अधिकारी श्रेणी-१ महागांव, अमोल काळमोरे सहाय्यक सहकार अधिकारी पुसद, राजेश नाईक, सहाय्यक सहकार अधिकारी दारव्हा, श्रीमती इरावती चव्हाण, लिपीक लेखापरिक्षक पुसद, तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी श्री. प्रविण वेरुळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पो.स्टे. वसंतनगर, संतोष चव्हाण, जमादार, विमल डवरे, महीला पोलिस शिपाई, अविनाश बळिराम राठोड जमादार, किरण राठोड म.पो.शि. गोपाल जाधव व सुजाता नरवाडे होमगार्ड, कॅमेरामन गजानन सुरोशे व समिर करे व पंच म्हणुन सुनिल जाधव ग्राम महसूल अधिकारी, ज्ञानेश्वर रेणके महसुल सेवक, इंदल चव्हाण, ग्राम महसुल अधिकारी, रोहण बिडकर, महसुल सेवक इत्यादी कर्मचारी सहकार विभाग, महसुल व पोलिस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close