श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय पुसद निकालाची उज्वल परंपरा कायम
विज्ञान शाखा ९८.३३%तर कला शाखा ८१.४४%निकाल

पुसद : येथील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय पुसद यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा वर्ग १२ वी चा निकाल जाहीर झाला असून या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. कला शाखेचा ८१.४४% तर विज्ञान शाखेचा ९८.३३% निकाल लागलेला असून कला शाखेतून कु. सुहानी विनोद गिरी-प्रथम क्रमांक ,कु. तन्वी गजानन भोसले- द्वितीय क्रमांक कु. जागृती पंजाब राठोड- तृतीय क्रमांक आणि विज्ञान शाखेतून कु. स्नेहल दत्तात्रय चव्हाण -प्रथम क्रमांक कु. श्रेया गजानन वाघमारे-द्वितीय क्रमांक कु. तनवी बाबुराव पांढरे -तृतीय क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी गुणवान विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, सचिव अश्विनी पाटील चोंढीकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य रामचंद्र हिरवे पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



