शेतकऱ्याची जमीन हडपण्याच्या उद्देशाने शेतात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान; गैरअर्जदारा विरुद्ध ॲट्रॉसिटी सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल!

पुसद: खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोहडा येथील शेतकऱ्यांची शेती हडपण्याच्या उद्देशाने शेतात पाणी सोडल्याने शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फिर्यादी त्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीतांनी जातिवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या घटनेच्या तक्रारीवरून खंडाळा पोलिसांनी आरोपी विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोहडा येथील रहिवाशी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर विशाल बबन कांबळे वय ३१ वर्ष यांची वडिलोपार्जित साडेचार एकर जमीन रोहडा शेत शिवारात आहे. ती शेती त्यांचें वडील बबन लक्ष्मन कांबळे वय ६० वर्ष यांचे नावाने आहे. सदर शेती फिर्यादीचा चुलत भाऊ विक्रम दिलीप कांबळे वय २८ वर्ष रा. रोहडा हे पाहतात. त्यांचे शेत शेजारी गैरअर्जदार रामा नामदेव राठोड वय ४० वर्ष, लक्ष्मन नामदेव राठोड वय ४५ वर्ष व सौ. गिता नामदेव राठोड वय ६० वर्ष तसेच सौ. विमल रामा राठोड वय ४० वर्ष सर्व रा. रोहडा यांनी जमीन हडपण्याच्या उद्देशाने प्रयत्न करीत शेतातील झाडे तोडणे वगैरे जानुन बुजुन शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. दि.३१ जुलै २०२४ रोजी सकाळी ०९/०० वाजण्याच्या सुमारास गैरअर्जदारांनी फिर्यादीच्या शेतात पाणी सोडल्शेयाने शेतातील पीक पूर्णता खरडून गेल्याने या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. फिर्यादी या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतात गेले असता गैरअर्जदारांनी हातात धारदार कोयते घेवुन अंगावर मारण्यास आले त्यानी कॉलर पकडली धक्काबुक्की केली व जातीवाचक शिवीगाळ केली. असल्याची तक्रार फिर्यादी विशाल कांबळे यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली आहे त्या फिर्यादीवरून खंडाळा पोलिसांनी गैरअर्जदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. पंकज अतुलकर हे करीत आहे.



