सहकार नेते ॲड . सूर्यकांत देशमुख अंतनात विलीन..

पुसद :खरेदीविक्री संघाचे सलग वीस वर्षे अध्यक्ष असलेले , कृभको फर्टीलायझर या शासकीय कंपनी दिल्लीचे माजी संचालक शेतीनिष्ठ शेतकरी तसेच माजी महिला बालकल्याण मंत्री श्रीमती यशोमती ताई ठाकूर यांचे मामा साप्ताहिक अक्षरनादचे संपादक सत्यजित देशमुख यांचे वडील अँड सूर्यकांत देशमुख वय ८३ वर्ष यांचे २ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, आज त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी दगडधानोरा पो शेंबाळपिंपरी ता पुसद येथे सकाळी ११:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी विजयमाला, तीन मुले श्रीकांत, सत्यजित व सोमदत्त, एक मुलगी श्रीलेखा जाधव, तीनसुना, पाच नातवंड असा परिवार आहे. अंत्यविधी वेळी माजी मंत्री यशोमती ताई ठाकुर, मा आ सुरेशदादा वरपूडकर, मोहिनी नाईक, अँड. आशिष देशमुख, तातू देशमुख, सदबाराव मोहटे, रवींद्र महल्ले, सय्यद अतिकोद्दीन, निशांत बयास, अनुकूल चव्हाण, डॉ मोहमद्द नदीम, प्रा शिवाजी राठोड, बी जी राठोड सर, सय्यद हकीमोद्दीन, प्रकाशराव देशमुख यासह परिसराचे प्रमुख व गावकरी मंडळी उपस्थित होते.



