सामाजिक

विदर्भाची पंढरी पुसद येथेआषाढी एकादशी यात्रेनिमित्त विविध सामाजीक उपक्रम!

पुसद: विदर्भाची पंढरी पुसद येथे पंरपरेने चालत आलेल्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाच्या निमित्याने विविध सामाजीक कार्याची जोड देण्यात येत आहे. या धार्मिक यात्रा महोत्सवा मध्ये समाज जागरण होण्यासाठी रक्तदान, नेत्रदान, देहदान तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर गुरुवार, दि. २९ जुन २०२३ रोजी श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे आयोजीत करण्यात येणार आहे. जनतेमध्ये देहदान विषया बाबत जनजागरण व्हावे, वैद्यकिय कॉलेज यवतमाळ मधील शरीर रचना शिकवीतांना डेड बॉडीज् ची कमतरता दुर करण्यासाठी देहदानांची आज नितांत गरज आहे. मेडीकल कॉलेज यवतमाळ द्वारा देहदानाचे संकल्प पत्र देण्यात आलेले आहे. गुजरी चौक येथे देहदान करणाऱ्या भाविकांसाठी लॉयन्स क्लब पुसद आणि श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद यांचे संयुक्त विद्यमाने स्टॉलवर नाव नोंदणी करण्यात येणार आहे. लॉयन्स क्लब पुसदच्या वतिने पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, संदिप जिल्हेवार, संतोष अग्रवाल, व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरज डुब्बेवार हे सेवा देत आहेत. देहदान करणाऱ्या भाविकांना फार्म भरुन देतांना आधारकार्ड ची सत्यप्रत आणि घरातील आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी यांच्या पैकी दोन व्यक्तींच्या सह्या द्यायच्या आहेत. देहदान करणाऱ्या व्यक्तीने आपला पासपोर्ट फोटो सोबत आणावा देहदान करणाऱ्या भाविकाला विठुरायाच्या थेट दर्शनाच्या तीन पास देण्यात येतील.जनतेमध्ये रक्तदाना बद्दल जनजागरण व्हावे आणि गरजू रुग्णाला रक्त पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद आणि मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांचे संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीला रक्तदान करणाऱ्या भाविकांस विठुरायाच्या थेट दर्शनाच्या दोन पासेस देण्यात येतील.
तसेच भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन याठिकाणी करण्यात आलेले आहे. याशिबीरामध्ये रक्तदाब तपासणी, पुर्ण जनरल तपासणी आणि ५० वर्ष वयाच्या वरिल भाविकांची ब्लडशुगर (रक्तातील साखर) तपासणी मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल तर्फे करण्यात येईल. या शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टर विरेन पापळकर, डॉ. संजय अग्रवाल, डॉ. जेनीस, डॉ. प्रतिक, डॉ. राम, डॉ. अमर, डॉ. किरण मॅडम सेवा देत आहेत.
यासोबतच सामाजिक कार्याची जोड देण्यासाठी या यात्रा महोत्सवामध्ये रक्तदान, नेत्रदान, झाडे लावा- झाडे जगवा, स्वच्छ भारत अभियान, स्त्रीभ्रुण हत्या, बेटी बचाव बेटी पढाव, करा योग रहा निरोग, पाणी आडवा – पाणी जिरवा ई. सामाजिक विषयाचे जनजागरण व्हावे, यासाठी संपुर्ण परिसरातील मंडपामध्ये बॅनर लावण्यात येत आहेत. तसेच वनविभाग पुसद च्या वतीने सवलतीच्या दरात विविध झाडांची रोपे वितरणासाठी स्टॉल लावण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close