ईतर

पुसद तालुक्यात बोगस बियाण्याचा पहिला बळी! हाकेच्या अंतरावर असलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यास राज्यमंत्र्याकडे वेळच नाही  ही मोठी शोकांतिका -शेतकरी नेते मनीष जाधव!

 

पुसद: तालुक्यातील भोजला या गावचे अल्पभूधारक शेतकरी सुखदेव रामराव ठाकरे वय ३५ याने दि.१२ जुलै २०२६ रोजी यांनी स्वतःच्या राहत्या घरी पेरलेलं सोयाबीन बियाणे न , उगवल्याने या नैराश्यात येऊन आर्थिक विवेचनेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते मनीष जाधव यांनी पुसद तालुक्यातील भोजला या गावचे पीडित दुःखी ठाकरे कुटुंबाची सांत्वनासाठी आज भेट घेऊन सर्व घटनेची माहिती घेतली त्यानंतर महसूल व कृषी विभागाच्या प्रशासनाला फोन करून संबंधित कुटुंबाला मदतीच्या बाबतीत तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्याची सूचना दिल्या मृतक सुखदेव ठाकरे पश्चात त्यांच्या सुविध्य पत्नी व दोन मुली, वडिल -आई व दोन भावंड असं कुटुंब आहे निर्व्यसनी, अत्यंत मनमिळाऊ प्रेमळ, मितभाषी, कष्टाळू सुखदेव च्या जाण्याने अवघ्या गावात शोककळा आहे. चालू खरीप हंगामात अलनिनो च्या दुष्काळाच्या दृष्ट चक्रात शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली असून यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस सोयाबीन बियाण्याच्या संदर्भाने शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर आल्याने असून कृषी विभागाच्या गुणनियंत्रण कार्यपद्धतीवर ताशोरे ओढत यांच्या मुकसंमती शिवाय हे बोगस बियाणे , बोगस फर्टीलायझर विकल्यास कसे जात असा प्रश्न उपस्थित केला बियाणे उपलब्ध करून संपूर्ण हंगामाचा खर्च या संबंधित सोयाबीन कंपनीकडून वसूल करण्यात यावे , अशी शासनाकडे त्यांनी यावेळी मागणी केली सततची नापिकी , कर्जबाजारीपणा ,नैसर्गिक आपत्ती शेतमालाला नसलेले भाव ,नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसान होऊन मिळत नसलेला पिक विमा, यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून एकाच दिवसात तीन तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे अधिकृत प्रशासकीय दप्तरी आकडेवारी समोर येत आहे हे अत्यंत गंभीर व दुर्दैवी बाब असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले असून बोगस खते व बोगस बियाण्याचा विक्री करणाऱ्या गोरख धंदा करणाऱ्या वर कठोर कारवाई होताना दिसत नाही या बाबत कृषी विभागावर वचक राहिली नसल्याचे दिसून येत आहे मंत्र्यांना याची नैतिक जबाबदारी घ्यावी या आत्महत्या नसून प्रत्यक्ष शासन यंत्रणे कडून केल्या गेलेल्या हत्या आहेत हाकेच्या अंतरावर असलेल्या भोजला या गावी पीडित दुखी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत सांत्वन पर भेट घ्यायला राज्यमंत्री इंद्रनील नाईक शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशीलता उरलेली नाही मोठी शोकांतिका असल्याची शेतकरी नेते मनीष जाधव यावेळी सत्ताधारी मंत्र्यांवर कडाडून टीका केली बियाणे जिल्ह्यात शिरकावच कसा होऊ शकतो शेतकऱ्यांना न्याय घेताना अनेक अडचणी येतात यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र न्याय प्राधिकरण स्थापन करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली यावेळी त्यांच्यासोबत शेषराव राठोड माजी सरपंच फेट्रा प्रेम राव सरगर तालुका अध्यक्ष पुसद विकास भाऊ राठोड काटखेडा दिगंबर तेलंगे अमोल झरकर व संपूर्ण ठाकरे परिवार सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी यांच्या सहकार्यकर्त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close