आगग्रस्त राऊत कुटुंबाला वेदवीर बहुद्देशीय संस्थेचा दिलासा; अध्यक्षा सौ. वृषालीताई वडत्या (नाईक) यांची तातडीची मदत.”
"संकटात दिलेला आधार हा कोणत्याही शब्दांपेक्षा अधिक मोलाचा असतो."

पुसद: तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील श्री.सुभाष राऊत यांच्या घराला अचानक भीषण आग लागून काही क्षणांतच त्यांच्या कष्टाने उभारलेल्या संसाराची राखरांगोळी झाली. घरातील कपडे, धान्य, भांडी, शैक्षणिक साहित्य, जीवनावश्यक वस्तू आणि अनेक वर्षांच्या श्रमांचे स्वप्न एका क्षणात जळून खाक झाले. उघड्यावर आलेल्या या कुटुंबाच्या डोळ्यांतील अश्रू पाहून संपूर्ण गाव हळहळले.ह्या अत्यंत दुःखद घटनेची माहिती डॉ.सौ.जयश्री ताई देशमुख (शेंबाळपिंपरी)मार्फत वेदवीर सेवाभावी संस्था, पुसदच्या अध्यक्षा तथा माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय मनोहरराव भाऊ नाईक यांच्या कन्या सौ. वृषालीताई वडत्या (नाईक) यांना* सदर घटनेची माहिती देण्यात आली. संकटाची माहिती मिळताच सौ. वृषालीताईंनी तात्काळ शेंबाळपिंपरी गावातील पिढीत कुटुंबाशी संपर्क साधून वेदवीर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पिढीत सुभाष राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांना शिलाई मशीन,जीवनावश्यक भांडी, संपूर्ण कुटुंबासाठी नवीन कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंची मदत उपलब्ध करून दिली.”दान म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे; तर दुसऱ्याच्या आयुष्यात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करणे होय.”सौ. वृषालीताई वडत्या (नाईक) यांच्या या संवेदनशील आणि तातडीच्या मदतीमुळे राऊत कुटुंबाला नव्याने उभे राहण्याची आशा मिळाली. त्यांच्या या कार्यामुळे केवळ एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण शेंबाळपिंपरी गावाला माणुसकीचा अभिमान वाटला. असे मत डॉ.सौ.जयश्रीताई देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगत व्यक्त करतांना केले.* समाजसेवा ही केवळ शब्दांत नसून कृतीतून जपली जाते, याचा प्रत्यय या प्रसंगी सर्वांना आला.आज समाजात अनेक जण मदतीच्या घोषणा करतात; परंतु संकटसमयी प्रत्यक्ष धावून जाऊन हात देणारे लोकच समाजाचे खरे आधारस्तंभ असतात. वेदवीर सेवाभावी संस्थेने ही परंपरा कृतीतून जिवंत ठेवली आहे. अशा सेवाभावी कार्यामुळे संस्थेचे नाव समाजात अधिक आदराने घेतले जात असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक कौतुक होत आहे.असे मत जैनुलभाई सिद्दीकी यांनी व्यक्त केले.गरजु लोकांना मदत करणे हे आमचे उत्तरदायित्व समजतो आणि वेदवीर बहुद्देशीय संस्था सदैव आपल्या सेवेत तत्पर राहील असे मत अध्यक्षीय भाषणात सौ.वृषालीताई वडत्या(नाईक) यांनी व्यक्त केले. या मदतवाटप प्रसंगी वेदवीर बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष तथा पुसद न.प.चे मा.बांधकाम सभापती मनीष भाऊ शाह, शेंबळपिंपरी येथील डॉ. नंदकुमार देशमुख, डॉ. जयश्रीताई देशमुख, सौ. पल्लवीताई देशमुख,राजेश वाहुळे,कुणाल देशमुख प्रा.वसंत राठोड ,दिलीप राव देशमुख, जैनुलभाई सिद्दीकी, संजय देशमुख,डॉ. अजित चंदेल उस्मान डांगे, रौपभाई सि्दीकी,संग्राम देशमुख गजानन मनवर देविदास कांबळे, सोनबा वाहूळे, सुभाष डाखोरे,बाला मास्तर देशमुख, मोहमद शाकीर, सुनील वाहूळे धरमसिंग राठोड(महाराज पोहरादेवी)तसेच लाभार्थी श्री. सुभाष राऊत, त्यांची पत्नी, मुलगा आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”माणुसकी जिवंत असेल तर कोणतेही संकट मोठे नसते; कारण अंधार कितीही दाट असला तरी एका दिव्याची ज्योत पुरेशी असते.”वेदवीर सेवाभावी संस्थेचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, संकटात सापडलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा हा सेवाभाव भविष्यातही असाच अखंड सुरू राहो, हीच सर्वांची सदिच्छा.



