राजकिय

पुसद मतदारसंघातअवघ्या १८ दिवसांत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ‘एसआयआर’ डिजिटल नोंदणी ६६ टक्के पूर्ण;उर्वरित १२ दिवसांत शंभर टक्के नोंदणीसाठी यंत्रणा सज्ज; एसडीओ आशिष बिजवल यांची पत्रकार परिषदेत माहिती!

पुसद : सध्या भारतीय निवडणूक आयोग मतदार ओळखपत्रे अद्ययावत करण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) नावाची एक विशेष मोहीम मोठ्या जोमाने राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पुसद विधानसभा-८१ मतदारसंघात या विशेष मतदार पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत सुरू असलेल्या डिजिटल नोंदणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, अवघ्या १८ दिवसांत तब्बल ६६ टक्के नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित १२ दिवसांत जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असल्याची माहिती आज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सर्वप्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.

पुसद विधानसभा-८१ मतदारसंघात एकूण ३ लाख २३ हजार ६५७ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ८१ हजार ४९५ एसआयआर अर्जांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत २ लाख १३ हजार ८८३ अर्ज भरून प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जांची डिजिटल डेटा एंट्री पूर्ण करण्यात आली आहे. नोंदणीच्या बाबतीत यवतमाळ जिल्हा राज्यात आघाडीवर असून, पुसद मतदारसंघानेही या मोहिमेत उल्लेखनीय गती घेतल्याचे बिजवल यांनी सांगितले.ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर नोंदणीचे प्रमाण समाधानकारक असले, तरी शहरातील ६० मतदान केंद्रे आणि श्रीरामपूर परिसरातील ९ मतदान केंद्रांवर नोंदणीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या केंद्रांवरील कामाला गती देण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.या विशेष मोहिमेअंतर्गत मतदारसंघात मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे आणि त्या पारदर्शक ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.ही प्रक्रिया पूर्णपणे निःपक्षपाती व्हावी म्हणून सर्व राजकीय पक्षांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते या नोंदणी मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. मागील रविवारी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, येत्या रविवारीही मतदारसंघातील सर्व ३४३ मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे घेतली जाणार आहेत. त्यावेळी मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नोंदणी पूर्ण करावी,पुसद मतदारसंघ सुमारे ३लाख २३हाजर ६५७एकुण मतदारापैकी सुमारे सव्वा लाख मतदारांची नोंदणी अद्याप बाकी असून, ती पुढील १२ दिवसांत पूर्ण करण्याचे संबंधित प्रशासनाचे उदिष्ट आहे.या मतदारांची पडताळणी करण्यासाठी ३४३ बीएलओ (BLO) ३५ पर्यवेक्षक, १३ एईआरओ यांच्यासह प्रत्येक बीएलओला सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत. सध्या ६६ % मॅपिंग पूर्ण करण्यात आलं आहे.तसेच बाहेरगावी असलेल्या मतदारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असून, कोणतीही अडचण आल्यास किंवा ‘एसआयआर अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी २००२ च्या मतदार यादीत नाव शोधण्यासाठी अडचण येत असेल तर पुसद तहसील कार्यालयातील मतदार सहाय्यता कक्ष येथे संपर्क साधता येणार आहे. यासाठी (०७२३३) २४६०३२ हा दूरध्वनी क्रमांक संबंधित प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांना नमुना-६ द्वारे नवीन मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.’एसआयआर’ चा अर्ज न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने जबाबदारीने अर्ज भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक अधिकारी आशिष बिजवल यांनी नागरिकांना केले आहे.

 

मतदार यादी ही लोकशाहीचा पाया आहे. एकही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहू नये आणि कोणतीही अपात्र नोंद कायम राहू नये, यासाठी सर्व राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, प्रतिनिधी आणि नागरिकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. ही केवळू प्रशासनाची जबाबदारी नसून लोकशाही बळकट करण्याची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close