गौळ खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राची १००फुट संरक्षण भिंत अज्ञातांने पडली; पंरतु संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱी कर्मचाऱ्यांनी घेतले ध्रुतराष्ट्राचे सोंग!

पुसद: तालुक्यातील गौळ ( खुर्द ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जवळपास १०० फूट संरक्षक भिंत अज्ञातांने रातोरात पाडून मलबा सुद्धा गायब केल्याची घटना दि. १५ जून शुक्रवार रोजी उजेडात आली आहे. विषेश म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी असलेल्या आरोग्य विभागाचे कर्मचाऱी झोपेत असल्याचे चित्र आहे,या घटने प्रकरणी पोफाळी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.पुसद तालुक्यातील गौळ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रावर जवळपास हजारो लोकसंख्येच्या आरोग्याचा भार आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेली निवासस्थाने सुद्धा आहेत. १९८६ या गावातील नारायण कान्हू हराळ यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १ हे.२१ आर दान दिली होती तेव्हापासून या जमिनीवर प्रा.आ.केंद्राची इमारत उभी आहे.वास्तविक पाहता येथे रात्रीला काही आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस निवासी राहतात. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकारी, आरोग्य कर्मचारी हे ड्युटी बजावतं असतानाही या प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत कोणी पाडली का.? पाडली हे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. शासकीय मालमत्तेचे आज्ञताने एवढे मोठे नुकसान केले तरीही आरोग्य विभागाचे कर्मचारी ध्रुतराष्ट्राचे सोंग घेत आहेत. .परंतु उत्तर देण्यास कोणी समोर येत नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी व संबंधित पोलीस विभाग कोणावर कारवाई करणार याकडे परिसरातील व गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.
,



