पुसद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त लेखक हस्तकांत जोरदार वादावादी ; महिला अधिकाऱ्या समोरच अश्लील भाषेत शिवीगाळ करुन विषय हातगाईवर;नागरिकांची लूट, कारवाईची मागणी, वरिष्ठांनी लक्ष घालावे

पुसद : तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री दस्त नोंदणी प्रक्रियेत दलालांचा आणि दस्त लेखक हस्तकांचा सुळसुळाट वाढल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. अधिकृत प्रक्रियेऐवजी दलालामार्फत आणि दस्त लेखकाच्या हस्तकांमार्फत व्यवहार होत असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचे आरोप होत आहेत.मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी दलालांची या कार्यालयात झुंबड उडत असते. मालमत्ता नोंदणीचा वाढता भार या कार्यालयाला पेलवत नसल्याचे चित्र समोर आले असून चक्क दस्तलेखकांच्या हस्तकामार्फत या कार्यालयातील दुय्यम निबंधक महिला अधिकाऱ्या समोरच दस्त खालीवर करण्यावरून दोन दस्त लेखक हस्तकामध्ये वाद निर्माण झाला हा वाद इतका विकोपाला जाऊन थेट अश्लील भाषेत शिवीगाळ हा विषय हादघाईवर आला त्यावेळी या घटनेची प्रत्यदर्शनी आपल्या भ्रमणध्वनीमध्ये चित्रण केले आहे त्यामुळे या कार्यालयातील भोंगळकराभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.परिणामी, सरकारी प्रक्रिया पारदर्शक राहण्याऐवजी दस्त लेखकाच्या हस्तकाच्या व दलालांच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमार्फत खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पाडले जातात. या व्यवहारांमधून शासनाला दररोज कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळतो जमीन, प्लॉट, सदनिका खरेदी-विक्रीपासून भाडेकरार, जुने दस्त मिळविणो या असंख्य कामांकरिता दुय्यम निबंधक कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांकडून दररोज लाखो रुपयांचा मलिदा उघड-उघड लुटला जाते तर मोठय़ा जोखमीच्या आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये काही त्रुटी काढुन जाणीवपूर्वक येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱी आपले खिसे चांगलेच भरले जात आहेत. तर दुसरीकडे कार्यालयांबाहेर कार्यरत असलेले अधिकृत आणि अनधिकृत दस्त लेखकांनी अनेक हस्तक नेमले आहेत. तेच या कार्यालयात येऊन अधिकाऱ्यासमोर व कर्मचाऱ्यासमोर दस्त नंबर लागण्यासाठी खालीवर करीत असतात त्यातूनच हा प्रकार घडला आहे. नेहमी वादग्रस्त असलेल्या येथील दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालयात काल दोन दस्त लेखकांच्या हस्तकांमध्ये वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली. इतकेच नव्हे तर महिला अधिकारी व कार्यालयीन कामासाठी आलेल्या अन्य महिलांसमोर या दस्त लेखक हस्तकाने अश्लील भाषेत शिवीगाळ करून दहशत पसरविली. या घटनेमुळे पुसदच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सुरु असलेल्या बेबंदशाही कारभाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी होत आहे.दि १जुन रोजी नेहमीप्रमाण दुय्यम निबंधक कार्यालयात स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारासाठी सकाळी ११:०० वाजता पासून या कार्यालयात नागरिकांची झुंबड उडाली होती. यावेळी खरेदी व्यवहाराच्या नंबरसाठी कागदपत्रे लावण्यावरून दोन दस्त लेखकांच्या हस्तकामध्ये सुरवातीला शाब्दिक वाद झाला. त्या वादाचे रूपांतर हातापाई आणि महिलांना लज्जास्पद वाटेल अश्या भाषेत अश्लील शिवीगाळ मध्ये झाले. एका हस्तकाने तर खरेदी कागदपत्रे फेकाफेक करून कार्यालयीन कामात अडथळा आणला. यावेळी कार्यालयीन कामासाठी आलेले सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हा संपर्क समन्वयक सुधाकर चापके यांनी पूर्ण घटनेला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.वरील संताप जनक प्रकारामुळे उपस्थित महिलांमध्ये अस्वस्थता पसरून त्यानी दुय्यम निबंधक अधिकारी श्रीमती विद्या तळेगावकर यांच्या कडे तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान पुसद च्या दुय्यम निबंधक कार्यालयात कोणत्याही नियमाचे पालन होत नसून कार्यालयीन अधिकाऱ्यांचा कोणावरच वचक नाही. त्यामुळे या कार्यालयात चार दोन खरेदी दस्त लेखकांची अरेरावी सुरु असते. खरेदीचा नंबर लावण्यावरून आपसात वाद , हातापाई व अश्लील शिवीगाळ हा प्रकार नित्याचाच आहे. तेही या कार्यालयातील महिला अधिकाऱ्या समोरच तरीही या महिला अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही या घटनेचा पुरावा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून पुसद च्या बेशिस्त दुय्यम निबंधक कार्यालयाला शिस्त लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालावे तसेच ज्या दस्तलेखक हस्तकांनी अरेरावी केली त्यांच्या दस्त लेखकांचे रजिस्ट्रेशन रद्द करावे आणि या हस्तकांना कार्यालयात प्रवेश बंदी करावी अशी मागणी सुधाकर चापके यांच्यासह कालच्या घटनेने मनस्ताप झालेल्या संतप्त नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.



