सामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विचार प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन; मा.संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन!

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 'बुध्द भीम गीतांचा' आर्केस्ट्रा बाहादार कार्यक्रम

पुसद : येथील प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती प्रबोधन पर्व२०२५च्या वतीने जुनी पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे ह्या कार्यक्रमांचे उद्घाटक राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे उपस्थित राहणार आहेत.याबाबत प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती प्रबोधन पर्व२०२५च्या वतीने झेप न्यूज ला दिलेली माहिती अशी की, पुसद येथील जुनी पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ता.१७ एप्रिल २०२५ रोज गुरुवारी विचार प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमात औरंगाबाद येथील अविनाश नाईक प्रस्तुत “यशोगाथा महासुर्याची” या बुध्द भीम गीतांचा आर्केस्ट्रा बाहादार कार्यक्रम होणार आहे .२०२५ रोजी विचार प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ साहेब म्हणून उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री ॲड.इंद्रनील मनोहरराव नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवरांची उपस्थित लाभणार आहे.तर ता.१८ एप्रिल २०२५रोज शुक्रवारी “मित्र वणव्या मधे गारव्या सारखा” या प्रसिद्ध कवीतेचे कवी तथा बहुजन चळवळीतील प्रबोधनकार अनंत राऊत यांचा विचार प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विधान परिषद सदस्य ॲड.निलयभाऊ नाईक हे उपस्थित राहणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवरांची उपस्थितीती लाभणार आहे. यावेळी विचार प्रबोधनाच्या कार्यक्रमास जनतेने मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती प्रबोधन पर्व२०२५च्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close