पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! हर्षी येथील शासकीय आश्रम शाळेत आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्याच्या सुरक्षा नियमाची पायामल्ली!
आदिवासी विद्यार्थ्यांनी धावण्याच्या स्पर्धेत अनवाणी (शूजशिवाय) घेतला सहभाग; खडबडीत रस्त्यावर किंवा मैदानावर अनवाणी धावल्यामुळे पायाला जखमा!

पुसद : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पुसदच्या वतीने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अंतर्गत हर्षी येथील शासकीय आश्रम शाळेत प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे मात्र आयोजकाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि योग्य नियोजनाकडे जाणीवपूर्वक या विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खेळाला खूप महत्त्व आहे. अलीकडील काळात खेळाकडे करिअर म्हणून पाहिले जाते.
त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने कुठल्यातरी खेळात नैपुण्य पूर्ण मिळवणे आजच्या काळाची गरज आहे. या आदिवासी विभागाने या क्रीडा स्पर्धे अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल,हँडबॉल, कबड्डी, खो-खो या सांघिक खेळांसह गोळा फेक भाला फेक, १०० मी ,२०० मी धावणे, यांसारख्या विविध वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन केले या खेळामध्ये अनेक पुसद प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मैदानावर विजयी विद्यार्थ्यांच्या जल्लोषामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले परंतु आयोजकांनी आदिवासींच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सुरक्षा नियमाची अंमलबजावणी केल्याचं दिसून येत नाही खरंतर स्पर्धा भरवली जाते आदिवासी बहुल भागांतील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी अनेकदा सुरक्षेच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही उलट संबंधित प्रशासन व आयोजक आदिवासींच्या विद्यार्थ्याकडे जाणीवपूर्वक आणि काही शिक्षकही कानाडोळा करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आज या शाळेच्या प्रांगणात धावण्याची शर्यतीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती परंतु संबंधित आयोजकांनी सुरक्षा दृष्टिकोनाने ज्या ट्रॅकवर धावण्याची शर्यत ठेवायची आहे ट्रॅकची तपासणी किंवा त्या ठिकाणी साफसफाई करण्याची गरज होती परंतु खेळ किंवा शर्यती आयोजित करण्यापूर्वी तो ट्रॅक विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे कां, याची खात्री शाळेने किंवा आयोजकांनी करणे बंधनकारक होते मात्र सुविधांचा अभाव: ट्रॅकवर धावण्यासाठी लागणारे सिंथेटिक ट्रॅक किंवा योग्य शूज सुरुवातीच्या काळात उपलब्ध नसतात. किंवा उपलब्ध करून देणे गरज असताना सुद्धा आयोजकांनी आदिवासी विद्यार्थीना जाणीवपूर्वक या खडतर किंवा धोकादायक ट्रॅकवर शर्यत निष्काळजीपणे घेतल्याने आणि सहभागी विद्यार्थ्यांना धावण्याच्या शर्यतीसाठी योग्य पादात्रणे नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी अनवाणी खडबडीत रस्त्यावर किंवा मैदानावर अनवाणी धावल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पायाला जखमा झाल्या त्यामुळे पळताना अनेक विद्यार्थ्यांच्या पायामध्ये दगडाचे किंवा ग्रीटीचे खडे घुसले तर काहीजणाचा पायाला दुखापती झाल्या तसेच ट्रॅकच्या बाजूला वैद्यकीय पथक मेडिकल टीम सज्ज न ठेवल्याने अनेक विद्यार्थी प्रथम उपचारापासुन वंचित राहिले त्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या या क्रीडा स्पर्धेदरम्यान भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. परंतु या प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्यांनी तसेच आयोजकांनी आदिवासी बहुल भागातील विद्यार्थी शासकीय आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा परिसरात सुरू असून काही आदिवासी समाजातील तथाकथित किंवा समाजासाठी मोठा नेता झालो असे म्हणून घेणारे स्वयंघोषित समाजसेवक यांनी सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या बाबत धृतराष्ट्राचे सोंगं घेतल्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे.



