क्राइम

तिस घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; ११ लाख२६हजार८०० रुपयांचा ऐवज हस्तगत!स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कार्यवाही 

यवतमाळ: जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत व आजूबाजूच्या जिल्ह्यात ३० घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ११,लाख२६, हजार ८०० रुपयांचे सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कमेसह ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

रंडो उर्फ फिरोज खान साहेब खान (वय३४ वर्ष), रा. तुकाराम बापू वार्ड मुखरे चौक पुसद असे अटक आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की,यवतमाळ जिल्हात चोरी, घरफोडी, मोटार साईकल चोरी असे गुन्हे उघडकीस आणणे तसेच अवैध धंद्याचा शोधासह कार्यवाही करणे यासबंधाने तसेच नेर पोलीस स्टेशन हद्दीत मागील दोन महीण्यात एका पाठोपाठ दिवसा घरफोडीचे चार गुन्हे घडल्याने घरफोडी करणा-या आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्याबाबत पवन बन्सोड, (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे आदेशान्वये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मागदर्शात विविध पथके तयार करून सदर आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी चोरी करणारा अट्टल चोराटा रंडो ऊर्फे फिरोज खान साहेब खान रा. तुकारामबापू वॉर्ड मुखरे चौक पुसद यांनी केला असल्याचे गोपनिय माहीतीव्दारे व तांत्रीक पुराव्याच्या आधार गुन्हा केल्याचे माहीती प्राप्त झल्याने त्याचा शोध घेत असतांना दि. १५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १३.०० वा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तसेच सायबर शाखा यवतमाळ येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अट्टल घरफोडी चोरटा रंडो ऊर्फे फिरोज खान हा पुसद येथे येत असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून अतिशय कौशल्यपुर्ण रितीने पोलीस कौशल्याचा वापर करन शिताफीने माहूर फाटा पुसद येथे पकडून त्याचेकडे घरफोडी चोरीचे गुन्हयाबाबत कौशल्यपुर्ण विचापूस तंत्राचा आधारे तपास केला असता यवतमाळ जिल्हातील एकूण १७ घरफोडी चोरीचे व अमरावती ग्रामीण ०५ व वाशिम जिल्हयात ०४ एकूण १३ घरफोडी चोरी आशा प्रकारे एकूण ३० घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कौशल्यपूर्ण उघड करुन त्याचेकडून गुन्ह्यात वापरलेल्या सुझुकी कंपनीचे स्कुटीची पाहणी करता त्याचेकडे घरफोडी मुददेमाल सोन्या, चांदीचे दागिणे, रोख रक्कम, व घरफोडी करण्यासाठी आवश्यक आसलेली हत्यारे व मोबाईल मिळून आले आहेत तसेच

१)पो.स्टे नेर अप.क.१७२/२०२४ कलम ३८०, ४५४ भादवि, २ )पो.स्टे नेरअप.क.१७७/२०२४ कलम ३८०, ४५४ भादवि

३)पो.स्टे नेर अप.क.१८२/२०२४ कलम ३८०, ४५४ भादवि

४)पो.स्टे नेर अप.क. २१८/२०२४ कलम ३८०, ४५४ भादवि

५)पो.स्टे महागांव अप.क.९५/२०२४ कलम ३८०, ४५४ भादवि

६) पो.स्टे वसंत नगर अप.क.२०३/२०२३ कलम ३८०, ४५७ भादवि

७)पो.स्टे घाटंजी अप.क. ७९३/२०२२ कलम ३८०, ४५४ भादवि

८)पो.स्टे घाटंजी अप.क. ८४५/२०२२ कलम ३८०, ४५४ भादवि

९)पो.स्टे दिग्रस अप.क. २७१/२०२२ कलम ३८०, ४५७ भादवि

१०)पो.स्टे दारव्हाअप.क. ८४२/२०२२ कलम ३८०, ४५४ भादवि

११)पो.स्टे दारव्हा अप.क. ८६१/२०२२ कलम ३८०, ४५४ भादवि

१२)पो.स्टे दारव्हा अप.क. ३८३/२०२३ कलम ३८०, ४५७ भादवि

१३)पो स्टे दारव्हा अप.क. ४१८/२०२२ कलम ३८०, ४५४ भादवि

१४)पो.स्टे दिग्रस अप.क. ४१/२०२२ कलम ३८०, ४५४ भादवि

१५) पो.स्टे.आर्णी अप.क.३३/२०२३ कलम ३८०, ४५४ भादवि

१६)पो.स्टे.महागाव अप.क.

२२३/२०२३ कलम ३८०,४५७ भादवि

१७)पो.स्टे.पुसद शहर अप.क.२८५/२०२२ कलम ३८०, ४५७ भादवि

१८)पो.स्टे मोर्शी अमरावती ग्रामीण अप.क.९१/२०२४ कलम ३८०, ४५४ भादवि

१९)पो.स्टे मोर्शी अमरावती ग्रामीणअप.क.५४६/२०२३ कलम ३८०, ४५४ भादवि

२०)पो.स्टे मोर्शी अमरावती ग्रामीणअप.क.२७३/२०२३ कलम ३८०, ४५४, ४५७ भादवि

२१)पो.स्टे मोर्शी अमरावती ग्रामीण अप.क.४५५/२०२३ कलम ३८०, ४५४ भादवि

तसेच वाशिम जिल्हातील इतर ०४ व अमरावती जिल्हयातील इतर ०५ असे एकूण ३० घरफोडी चोरीचे गुन्हे करणारा अटटल घरफोडी चोराटा रंडो उफ फिरोजखान साहेबखान वय ३४ वर्ष रा. तुकारामबापू वॉर्ड मुखरे चौक पुसद याचे कडून १३४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व ४२१.७ ग्रॅम चांदीचे दागिणे, गुन्हयातील वापरलेले मोटार सायकल, मोबाईल व रोख रक्कम ६३,५००/- असा एकूण ११,२६,८००/- रु चा मुददेमाल जप्त करुन त्यास पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन नेर यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ पवन बन्सोड सा, मा अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप सा, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोलीस निरीक्षक परदेशी, सपोनि आमोल पुरी सायबर शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि रेवण जागृत, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहवा सोहेल मिर्झा, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/ रमेश राठोड, पोशि/ मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोकॉ अजय निंबोळकर, पोकों अभिनव बोंद्रे, मपोकों पुजा भारस्कर सायबर शाखा यवतमाळ, पोलीस मित्र सुंशात गिरनाळे, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close