शैक्षणिक

विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल, पुसद ने रचला इतिहास;यवतमाळ जिल्ह्यातील सर्वोत्तम निकाल!

सीबीएसई पॅटर्न दहावीचा सलग तिसऱ्या वर्षी१०० % निकाल,६ विद्यार्थ्यांना ९५% पेक्षा अधिक, १९ विद्यार्थ्याना ९०% पेक्षा अधिक आणि तब्बल ३७ विद्यार्थ्यांना ८५% पेक्षा अधिक गुण प्राप्त!

पुसद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई) ने जाहीर केलेल्या निकालात विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल, पुसद चा इयत्ता दहावीचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला असून, जिल्ह्यातून सर्वोत्तम निकाल शाळेचा लागला आहे.सलग तिसऱ्या वर्षी ही उल्लेखनीय कामगिरी शाळेने कायम राखली आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यावर्षीच्या परीक्षेत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत गुणवंत यादीत स्थान पटकावले आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेचे शैक्षणिक वातावरण यामुळे हा उत्तम निकाल साध्य झाला आहे.

शाळेच्या प्राचार्य श्रीमती राधा धागमवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकवर्ग आणि पालकांचेही या यशात मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.या यशाचे खरे श्रेय विद्यार्थ्यांच्या अपार मेहनतीला आणि सातत्याला जाते. वर्षभर अभ्यासाचे चोख नियोजन, कठीण विषयांवर केलेली पकड आणि परीक्षेच्या काळात दाखवलेला संयम यामुळेच विद्यार्थ्यांनी हे उत्तुंग यश संपादन केले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि अभ्यासात कमालीचे सातत्य ठेवून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या या जिद्दीचे आणि परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सलग तिसऱ्या वर्षी शाळेचा निकाल १०० % लागलेला असून, ६ विद्यार्थ्यांनी ९५% पेक्षा अधिक, १९ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण आणि तब्बल ३७ विद्यार्थ्यांनी ८५% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.उत्तम गुणवत्ताधारक विद्यार्थी (Top Achievers)१) अंतरीक्ष अविनाश आडे ९८%,२) आराध्या रमेश चव्हाण ९७.४ %,३) निपुण आशिष कदम ९७%,४) आरुषी सुरेश असोले ९६.४%,५) शरयू रघुवीर चाटरमल ९५.२%६) सृष्टी संतोष नरवाडे ९५.२%७) देवांशी सचिन शिंदे ९३.४%, ८ ) दिवा अतीश वाघमारे ९३%,९) श्रद्धा रमेश गंगाखेडे ९२.८%,१०) पार्थ तुकाराम चव्हाण ९२.४%,११) खुशी शिवाजी शिंदे ९२.२%१२) अथर्व दत्तात्रय लोखंडे ९२%,१३) अवंती गजानन नारनवरे ९१.६%,१४) आयुष प्रफुल्ल अकोलकर ९१.२%,१५) समर्थ राजेश्वर सोळंके ९१.२%,१६) रोहित गजानन ढोरे ९१.२%१७) अंशुल रवींद्र लोहिया ९०.८%१८) स्मही संदीप निलावार ९०.४%१७) वेदांत संतोष मारकड ९०.४% विद्यार्थ्यांच्या या यशात पोदार स्कूलच्या शिक्षकांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. केवळ वर्गात शिकवण्यापुरते मर्यादित न राहता, शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वैयक्तिक वेळ दिला. परीक्षेच्या तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार देत, त्यांच्यातील आत्मविश्वास जागवण्याचे काम शिक्षकांनी चोख बजावले. शिक्षकांच्या नियोजित मार्गदर्शनामुळे आणि ‘डाऊट सॉल्व्हिंग’ सेशन्समुळे विद्यार्थ्यांना कठीण विषयही सोपे झाले.पोदार स्कूलच्या या यशामागे शाळेचा ‘उत्कृष्ट अभ्यासक्रम’ आधुनिक अध्यापन पद्धतीचा मोठा वाटा आहे. केवळ पाठांतर न करता संकल्पना स्पष्ट करण्यावर दिला जाणारा भर आणि नियमित सराव परीक्षा यामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना पोदार स्कूलचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स  शरद मैंद, सूरज डुबेवार, संतोष अग्रवाल, मनिष अनंतवार  संगमनाथ सोमावार यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन केले, तसेच “विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि शिक्षकांचे समर्पण यांचे हे गोड फळ आहे. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षक वृंदाचा सार्थ अभिमान असल्याचे म्हटले.प्राचार्या श्रीमती राधा धागमवार यांनी विद्यार्थ्यांच्या अप्रतिम कामगिरीवर अभिमान व्यक्त केला, तसेच त्या म्हणाल्या की, ही यशस्वीता त्यांचे शैक्षणिक तेज आणि दृढ संकल्पाचे प्रतीक आहे. सामूहिक यश विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या अथक परिश्रमाचे परिणाम आहे. तसेच त्यांनी इयत्ता 10विच्या शिक्षकांच्या अडिग कामगिरीचे कौतुक केले, ज्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समर्थन आणि प्रेरणा प्रदान केली.प्राचार्यांनी माता-पित्यांचे आभार मानले, आणि म्हटले की त्यांचा पाठिंबा, सहकार्य, आणि विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले आहे.उपप्राचार्य, प्रशासन अधिकारी, आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे कुटुंबीयांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर विविध सहशालेय उपक्रमांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा लौकिक वाढवला आहे. शाळेच्या या सातत्यपूर्ण यशामुळे पुसद परिसरात विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close