पुसद येथे महेश नवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन!

पुसद : राजस्थान मंडळ पुसद अंतर्गत पुसद तालुका माहेश्वरी संघठन व पुसद तालुका माहेश्वरी महिला संघठन यांच्या संयुक्त विद्यमानाने महेश नवमी उत्सव साजरा होणार आहे त्या निमित्य राजस्थानी समाज बांधवानसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ जुन ते दिनांक २३ जुन २०२६ पर्यंत करण्यात आले आहे.आयोजित कार्यक्रमामध्ये दि १८ जुन ला सकारी ८ वाजता रक्तदान शिबिर, दि. २० जुन ला बॉक्स् क्रिकेट प्रतियोगिता (सामना) , दि. २१ जुन ला सकाळी ७ वा. जागतिक योग दिन (योगाभ्यास), स. ९ वा. वृक्षारोपण, स. ११ वा बॅडमिंटन, दु. २ वा टेबल टेनिस , दु.४ ते ७ पर्यत “रिस्ता वही सोच नयी” कार्यक्रम अनिल राठी व डॉ. प्रशांत मोदानी द्वारा संचालीत होणार आहे. तसेच दि २२ जुन ला स. ७ वा. सफाई अभियान व खेळ सत्रांत बुद्धीबळ, ड्रेझर हंट, भगवान महादेव ची पुजेची आरती ताट सजवणे, रंगभरा स्पर्धा , ग्रिटिंग कार्ड बनवा , धान्यापासुन गालीचा सजवणे , ग्रुप स्पर्धा , शिवभजन स्पर्धा , फॅन्सी ड्रेस, टॅलेन्ट शो, वादविवाद स्पर्धा , आप की अदालत, स्वर्णयोग सन्मान मध्ये चार पिढी पासुन एकत्र राहणाऱ्या कूटुंबाचा सत्कार , सहभोजन, दिनांक २३ जुन ला सकाळी बालाजी मंदिर येथे भगवान उमा महेश वंदना, अभिषेक, होम हवन, स. ८वा भव्य शोभायात्रा, नुक्कड नाटीका, संध्याकाळी महेश वंदना, स्वागत नृत्य , राजस्थान की विरांगनांए , ज्वलंत सामाजीक विषयावर अशोक हेडा यांचे द्वारे मार्गदर्शन, भगवान महेश ची आरती, पुरस्कार वितरण होणार आहे तरी वरिल सर्व कार्यक्रमात राजस्थानी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन राजस्थान मंडल पुसद, पुसद तालुका माहेश्वरी संघठन , पुसद तालुका माहेश्वरी महीला संघठन ने केले आहे.



