ईतर

डॉ.बाबासाहेबांना एका समाजापुरते मर्यादित करू नका: प्रा.सैय्यद सलमान, पुसद यवतमाळ येथे भीम जयंतीनिमित्त प्रेरणादायी वैचारिक व्याख्यानाचे आयोजन! 

यवतमाळ /प्रतिनिधी:भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता नगर, यवतमाळ येथे वैचारिक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कांबळे सर होते, तर मुख्य वक्ते म्हणून पुसद येथील युवा व्याख्याते व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सैय्यद सलमान सर उपस्थित होते.“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कल्याणकारी राज्याची संकल्पना” या विषयावर त्यांनी प्रभावी व्याख्यान दिले. आपल्या भाषणात प्रा. सलमान सर यांनी संत साहित्याचा आधार घेत समाजात बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना वाढविण्याची गरज अधोरेखित केली.ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित ठेवणे चुकीचे आहे. त्यांचे कार्य सर्व समाज, सर्व धर्म आणि सर्व घटकांसाठी प्रेरणादायी आहे.” त्यांनी तरुणांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तत्वांवर चालण्याचे आवाहन केले.यावेळी प्रा. सैय्यद सलमान सर यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, समता नगर यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये सामाजिक जाणीव व वैचारिक प्रेरणा निर्माण झाली.शेवटी उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानत अशा प्रकारचे वैचारिक कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close