ईतर

दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर स्मृती व्याख्यान पुष्पाचेआयोजन!

पुसद : येथील श्री.शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष, माजी आमदार तथा श्री. शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान पुष्पाचे आयोजन शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ ला सायं. ठिक ६:०० वाजता श्री. शिवाजी विद्यालयाच्या देवराव पाटील चोंढीकर सभागृहात करण्यात आले आहे. श्वास माझा गीत व्हावे अर्थात समर्पण हेच जीवन’ या विषयावर संस्कृत विभाग प्रमुख, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील प्रा. डॉ. स्वानंद पुंड हे व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत. अविरत चालणाऱ्या व्याख्यान पुष्पाचे हे ३७ वे वर्ष आहे. पुसद शहर व परिसरातील नागरिकांनी या वैशिष्ट्यपूर्ण, श्रवणीय व प्रेक्षणीय व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी, कार्याध्यक्ष माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, कोषाध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर व श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close