ईतर

मार्च अखेर कोट्यावधीची कर वसुली करणाऱ्या पुसद नगरपरिषद चा कारभार चव्हाट्यावर! पेट्रोल पंपाचे दोन लाखाचे बिल थकित;अग्निशमन वाहनाला डिझेल न देण्याचे पंप चालकाने लावले फलक!

पुसद : सध्या नगरपरिषदेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सुर्य आग ओकतोय उन्हाचा पारा जवळपास ४० अंशाच्या पार गेला आहे. या वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत अनेक ठिकाणी आग लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी, कुटुंबासह इतरांच्याही जीविताला धोका पोचू नये, यासाठी उन्हाळ्यामध्ये नागरिकांना दक्ष राहाण्याची गरज आहे.या वाढत्या उन्हामुळे काही वेळा शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणाने आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत त्यामुळे मोठे अपघातात किंवा जीवित व वित्तहानी होऊ शकते त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने दक्ष राहण्याची गरज आहे. तेव्हाच आपण प्रामुख्याने उन्हाळ्यात अशा घटना आपण रोखू शकतो. परंतु जनतेच्या जिवितासह त्यांच्या संपत्तीचे आगीपासून व अन्य दुर्घटनेपासून संरक्षण करण्याचे बंधनकारक कर्तव्य ज्या नगरपरिषद प्रशासनावर आहे त्यांनी मात्र शहरातील पेट्रोल पंपाचे बिल थकविल्यामुळे अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन विभागाच्या गाडीला पेट्रोल पंप चालकाने पेट्रोल न देण्याचे फलकच आपल्या पेट्रोल पंपावर लावल्या असल्याने एखादी शहरात मोठी घटना घेतली तर हे प्रशासन तात्काळ सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देऊ शकत नाही त्यामुळे या नगरपरिषद प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती सौ.मोहिनी ताई नाईक यांनी पुसद शहराला इंदौर किंवा गुजरात सारखी स्मार्ट सिटी बनविण्याचे स्वप्न पुराची बाळगून या नगराध्यक्ष पदाचे सूत्रे हाती घेतले आहे मात्र आपल्या च अधिपत्याखाली असलेल्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क अग्निशमन वाहनाने आज पर्यंत वापरलेल्या डिझेलचे बिल थकविल्यामुळे पेट्रोल पंप चालकाने अग्निशमन वाहनाला डिझेल न देण्याचे फर्मान काढले आहे त्यामुळे डिझेलचे बिल थकविल्यामुळे नगरपरिषदेवर नामुष्की ओढवली आहे परंतु जनतेच्या जिवितासह त्यांच्या संपत्तीचे आगीपासून व अन्य दुर्घटनेपासून संरक्षण करण्याचे जबाबदारी ज्या विभागात आहे त्याच विभागाला शहरात डिझेल मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय?सुर्य आग ऐकतोय उन्हामुळे आगीसारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही शहराची हद्द मोठी झाल्याने कमी वेळात घटनास्थळी पोचण्याचे आव्हान या अग्निशमन दलावर आसते अशा परीस्थितीत महाजन पेट्रोल पंप चालकाने नगर पालिकेकडे दोन लाख रुपये आधीच डिझेलचे बिल थकीत असल्याने अग्निशामक वाहनाला डिझेल देवु नये असे पंपावरील डेपोवर फलक लावले आहे. त्यामुळे शहरात एखादी दुर्घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण? एकीकडे मार्च अखेर पर्यंत मालमत्ता करापोटी नगरपरिषदेने कोट्यावधी रुपयांचा नागरिकांचा कर जमा केल्यानंतरही अत्यावश्यक सेवा पुरवण्यास किंवा त्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यास हे स्वराज्य संस्था अपेशी ठरत असेल तर नागरिकांनी कोणाकडे पाहायचे हे प्रशासन अग्निशामक वाहनास डिझेलचे पैसे देवू शकत नाही हे मात्र दुर्दैव आहे परंतु संबंधित कंत्राटदारांचे देयके देणेसाठी लेखा विभागात चार कर्मचारी कार्यरत आहेत. चेक लिहून लिहून ते थकून गेले आहेत. इतर कामाचे संबंधित कंत्राटदार ठरल्याप्रमाणे सर्वांना टक्केवारी देतात त्यामुळे त्यांचे बिल काढण्यात येत आहे. परंतु पेट्रोलपंप चालकाचे दोन लाख रुपये थकले तरी या नगर परिषदेला या पंपचालकाचे बिल अदा केले जात नाही तर हे शहर स्मार्ट सिटी कसे होणार की ते स्वप्नच राहणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close