ईतर

राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कु. मिनाक्षी खंदारे यांची उल्लेखनीय कामगिरी

पुसद : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये कोषटवार दौलतखान विद्यालय व गो. मु. कनिष्ठ महाविद्यालय, पुसद येथील विज्ञान शिक्षिका कु. मिनाक्षी कोंडबाराव खंदारे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत त्यांनी तालुका स्तरावर प्रथम व तृतीय क्रमांक, तसेच जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दि.८ मे २०२५ गुरुवार रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत , डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
संस्थाध्यक्ष, सभापती तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे व पर्यवेक्षक आणि सर्व सहकारी शिक्षक वृंदांनी कु. मिनाक्षी खंदारे यांचे अभिनंदन केले.

हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक कार्याची पावती
असून, तो पुढील कार्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यशामागे गुरुजनांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि सर्वांचे प्रोत्साहन लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close